Breaking News Maharashtra : कोकण भागात महत्वाच्या ठिकाणी हवामान विभागने अर्लट जारी केला आहे. आयएमडीने ( IMD ) दिलेल्या माहितीनुसार कोकणात नुकसानदायी पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई आणि ठाणे या भागात आज रात्री मुसळधार पावसाची सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी सारख्या पावसाची सुरुवात होण्याची शक्यता असल्यामुळे हवामान खात्याने रेड अर्लट जारी केला आहे. कोल्हापूर, पुणे, नाशिक, जालना, छत्रपती संभाजीनगर, सातारा, परभणी या जिल्ह्यात पुढीत तीन तासात विविध भागात पाऊस पडणार आहे.
कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात १४२ लाख हेक्टर पैकी २० लाख हेक्टर वर १४ टक्के परेणी झाली आहे. जो पर्यंत राज्यात पेरणी योग्य पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.