Cattle Fodder :पावसाळ्यात बहूतांश भागात पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा मिळणे अवघड झाले आहे. तसेच भविष्यात जनावरांच्या चारा कुठून आणवा असा प्रशन शेतकऱ्यांना पडला आहे. मोफत वैरण बियाणांसाठी हि शासनाची योजना रामबाण ठरत आहे. कारण जि. प. पशुसंवर्धन विभागाकडे पशुपालकांचे ८ हजार ६१० पर्यंत प्रस्ताव आले होते.
पशुपालक शेतकऱ्यांना या शासनाच्या योजनेअंतर्गत १ हजार ५०० रुपायांची मक्का, नेपियर जातीचे थोंबे, न्युट्रीफिड बाजरी इतर, चाराची कमतराता भासू नये यासाठी प्रतिलाभार्थीला दिले जात आहे. या योजनेअंतर्गत ८ हजार ६१० प्रस्ताव आले होते, यास पशुसंवर्धन विभागाने मान्यता दिली तसेच वैरणीसाठी बियाणांचा पुरवठा योजनेअंतर्गत दिला जाणार आहे. सर्वात महत्वाचे खरीप हंगामात वैरणांचे पिक घेण्यासाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.