Cattle Subsidy : महाराष्ट्रात जनावरांच्या किमतीत दिवसांन दिवस वाढ होत आहे. त्यामुळे आत पुन्हा एकदा जनावरांच्या अनुदानात वाढ झाली आहे. जर तुमच्या कडे गायी म्हैशी असेल आणि अनुसूचित जाती जमाती मध्ये मोडत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. गाईसाठी ७० हजार तर म्हैशीसाठी ८० हजार रुपये वाढीव अनुदान देण्याचे निर्देश कृषी पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने दिले आहे.
Cattle Subsidy : वाढीव अनुदान
जे शेतकरी अनुसूचित व जाती जमाती मोडतात अशा लाभार्थी शेतकऱ्यांना स्वयंरोजगार द्वारे साधन उपलब्ध करुन त्यांना दोन दुधाळ जनावरांचा १ गट तयार करुन ७५ टक्के पर्यंत अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
योजनेअंतर्गत २०११ पासून आतापर्यंत एकदा हि जनावरांच्या किंमतीत झालेला पाहिला मिळाला नाही. पण प्रथमच दुधाळ जनावरांच्या किंमतीत बदल करत, योजनेअंतर्गत गट नुसार शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांनसाठी प्रत्येकी गाईसाठी ७० हजार तर म्हैशीसाठी ८० हजार रुपये वाटण्यास मंजूर दिली आहे.
योजनेअंतर्गत सध्या गाईची किंमत १ लाख १७ हजार रुपये तर म्हैशीसाठी १ लाख ३४ हजार मानली गेली आहे. यातून गट नुसार शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. २५ टक्के हि रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १० ते १२ लिटर दुध देतील असे जनांवरे वाटण्यात येणार आहे.
लाभ मिळवण्यासाठी काही नियम
लाभार्थी दारिद्ररेषेत असावा, अल्प भूधारक असावा, लाभार्थी बेरोजगार असावा, महिला बचत गटात सामील किंवा लाभार्थी असणे बंधनकारक आहे. एकाच कुटूंबातील सदस्याला अनुदान मिळणार आहे.
अशाप्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group सामील होऊ शकतात.