Cotton Big Rate : एक महिन्यापासून राज्यात सरासरी ८००० ते ८५०० पर्यंत कापसाला भाव मिळत आहे. या वर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त दर ९१०० पर्यंत कापसाला मिळाला आहे. तसेच मागील वर्षी कापसाला जानेवारी महिन्यात १० हजार पेक्षा जास्त दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मते याही वर्षी मागील वर्षाप्रमाणे कपसाला मागणी व दरही वाढेल, त्यामुळे शेतकरी कापूस विक्री करण्याऐवजी घरातच कापसाची साठवण करत आहे.
Cotton Big Rate |
राज्यात कापसाला १५ हजार पेक्षा जास्त भाव ( Cotton Big Rate )
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणत शेतकऱ्यांनी केली होती. पण यावर्षी अतिवृष्टी व बोंड आळीचा प्रादभार्व वाढल्याने कापसाच्या उत्पादनात सुध्दा मोठी घट समोर आली आहे. तेलंगणा या राज्यात कापसाच्या उत्पादनात मोठी घट असल्यामुळे या ठिकाणी १५ हजार पेक्षा जास्त दर मागील काही दिवसात मिळला आहे. पण अचानक येथील कापसाच्या भावात घसरण पाहयला मिळाली आहे. तेलंगणा राज्यात सरासरी कापसाला दर ७ हजार ते ६ हजार पर्यंत कापसाला भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी आक्रमक भूमिका माडत आहे.
कापसाचे भाव वाढत का नाही ? ( Cotton Import News )
कापसाचे भाव न वाढण्याचे कारण म्हणजे केंद्र सरकार, असे जाणंकरांच मत आहे. दोन वर्षापासून कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली त्यामुळे अनेक कापड गिरण्या बंद आहेत. यावर्षी केंद्र सरकारने ऑस्टेलियाकडून ३ लाख कापसाच्या गाठी आयात केल्या आहेत. यामध्ये आयातीवर शुल्क ११ टक्के हे माफ केले आहे. जाणंकरांच्या तीन लाख गाठी म्हणजे ५१ हजार टन कापूस आयात केल्यामुळे भारतातील बाजार समिती मध्ये कापसाच्या दरावर यांचा मोठा परिणाम पाहयला मिळेल. चीन मध्ये कोरोनामुळे तेथील बाजारपेठेत व्यापार हा मंदावला आहे. अशा परिस्थितीत कापसाचे दर वाढतील याची शक्यता कमी आहे. पण काही जाणंकारांच्या मते कापूस आयात केल्यामुळे कापसाच्या दरावरती परिणाम होणार पण हा परिणाम जास्त काळ राहणार नाही. तसेच चीन मध्ये परिस्थिती चांगली होत असल्यामुळे चीनकडून कापसाची मागणी येऊ शकते. त्यामुळे कापसाचे भाव वाढत जातील.
महाराष्ट्रात कापसाच्या दरा विषयी अपडेट ( Cotton Update )
मिळालेल्या माहिती नुसार, महाराष्ट्रात १ हजार ते ५०० रुपयांनी कापसाच्या दरात घसरण झालेली आहे. महाराष्ट्रात मागील वर्षी कापसाची लागवड हि कमी झाली होती पण यावर्षी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर हे कमी झाल्यामुळे याचा परिणाम भारतातील बाजारपेठेवर सुध्दा झाला आहे. महाराष्ट्रात आता सरासरी कापसाला भाव ७ हजार पासून ते ८ हजार पर्यंत कापसाला दर मिळतो.