Cotton Market : आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला १५ हजार पेक्षा जास्त भाव मिळाला

Cotton Market : डिंसेबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात कापसाच्या भाव हे कमी झाले होते. पण जानेवारी २०२३ मध्ये कापसाच्या भावात पुन्हा एकदा तेजी येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात प्रत्येक बाजार समिती मध्ये १०० ते २०० रुपयांनी कापसाचे भाव मागील आठवड्यापासून वाढत आहे. WhatsApp Group 

Cotton Market
Cotton Market

महाराष्ट्रात सरासरी कापासाचे भाव ( Cotton Market )

मागील सोमवारी महाराष्ट्रात ७६०० ते ८५०० पर्यंत सरासरी कापसाला दर मिळत होता. या आठवड्यात काहीशी सुधारणा झालेली पाहयला मिळत आहे. ७ जानेवारी २०२३ या तारखेला महाराष्ट्रातील बाजार समिती मध्ये ८ हजार ५०० ते ९ हजार १०० पर्यंत कापसाला दर मिळाला आहे. जाणंकारांच्या भारतातील अनेक बाजार समिती मध्ये ७०० ते १००० रुपयांनी कापसाचे दर वाढलेले पाहयला मिळाले आहे. तसेच पुढे चालून कापसाचे भाव वाढतील पण त्यासोबत चढ उतार सुध्दा पाहयला मिळेल.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव वाढले

आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत २४२ रुपयांनी कापसाच्या दरात तेजी पाहयला मिळाली आहे. मंगळवारी ३ जानेवारी २०२३ तारखेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ( 84.34 प्रति पाऊंड ) १५ हजार ३०० रुपये पर्यंत कापसाचे भाव वाढले होते. ३ जानेवारीच्या तारखेच्या तुलनेत शुक्रवारी ६ जानेवारी २०२३ या तारखेला ( 85.68 प्रति पाऊंड ) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १५ हजार ५४२ रुपये पर्यंत कापसाचे भाव वाढले आहेत. म्हणजेच शुक्रवारी कापसाच्या भावात २४२ रुपयांनी वाढलेले पाहयला मिळाले आहे.

चीन कोरोना मुळे तेथील बाजारपेठेत हे व्यापार मंद गतीन चालू होते. मिळालेल्या माहिती नुसार चीन व्यापारी चांगल्या रितीन सुरु लवकरच होतील त्यामुळे तेथून कापसाची मागणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या भावात आणखीन सुधारणा होण्याची शक्यता आहे.

WhatsApp Group आताच जॉईन व्हा

कापसाचे भाव वाढतील का ? 

मागील वर्षी प्रमाणे याही १२ हजार ते १३ हजार दरम्यान कापसाला भाव मिळेल या आश्याने शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला. पण मागील वर्षी शेतकऱ्यांनी कापूस लागवड कमी होती तसेच कापसाचे उत्पादन सुध्दा कमी झाले होते तसेच केंद्र सरकारने बाहेर देशातून कापूस आयात केला नव्हाता आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी होती त्यामुळे कापसाच्या भावात मोठी तेजी आलेली पाहयला मिळाली होती.

जाणंकारांच्या मते यावर्षी केंद्र सरकारने बाहेर देशातून मोठ्या प्रमाणात कापूस आयात केला आहे. अजून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कापासाचे दर हे प्रति पाऊंडने वाढलेले नाही. चीनकडून सुध्दा कापसाची मागणी झालेली नाही. पण तरीही पुढे चालून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तसेच चीनकडून सुध्दा कापसाची मागणी वाढण्याची शक्यता जास्त असल्यामुळे कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात जाणंकराच्या मते बाजार समिती मध्ये ८ हजार पासून ते ९ हजार ५०० पर्यंत कापसाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment