Cotton Market : कापसाचे भाव कधी वाढणार ?

Cotton Market : नमस्कार शेतकरी, महाराष्ट्रातील बाजार समिती मध्ये कापसाचे भाव २०० ते ५०० कमी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांन मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी महाराष्ट्रासह पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश अशा इतर राज्यात कापसाची लागवड वाढून सुध्दा कापसाची कमतरता दिसून येत आहे. कापसाचे भाव वाढतील या आशाने शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला आहे. पण सध्याचे वातावरण पहात पुढील महिनाभर कापसाच्या भावात चढ उतार पाहण्यास मिळेल असे जाणंकरांचे मत आहे.

 

Cotton Market
Cotton Market

 

आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कापसाची मागणी मागील वर्षी होती. पण यावर्षी चीन मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे तेथील सरकार पूर्णपणे निर्बंध हटवण्यास सज्ज नाही. त्यामुळे चीन मधील मार्केट बंद राहण्याची शक्यता जास्त निर्माण होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत चीनकडून कापसाची मागणी कमीच राहण्याची शक्यता आहे.

 

 

या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कापसाचे भाव वाढले होते तरीही देशात कापसाचे भाव वाढतांना दिसत नाही. आज कापसाचे भाव कमी झाले आहेत. ८ हजार ८०० ते ८ हजार ५०० पर्यंत आज सरासरी कापसाला भाव मिळत आहे. कापसाच्या भाव कमी झाल्यापासून कापसाची आवक सुध्दा कमी झाली आहे.

 

 

भारतात कापसाची आवक सव्वालाख गाठी अंदाजे आल्ये आहेत. काही जाणंकरांच्या मते, जानेवारी महिन्यात कापसाचे भाव पूर्वपातळीवर येतील तसेच कापसाला ९ हजार भाव असेल. तसेच त्याच उलट काही जाणंकरांच्या मते, कापसाच्या भावात पुढील दीड ते एक महिना चढ उतार होण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारी महिन्यात कापसाच्या भाव चांगलीच तेजी येईल असा अंदाज आहे. तरीही शेतकऱ्यांनी बाजार समितीचा आढाव घेऊनच आपला कापूस टप्प्याटप्प्याने विकावा असे जांणकरांच मत आहे.

Onions Rate; महत्वाचे कांद्याच्या दरात होतेय मोठी घसरण, जाणून घ्या का होतेय घसरण ?

Leave a Comment