Cotton Market : नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील आठवड्यात कापसाचे भाव हे ८ हजार ते ८ हजार ३०० पर्यंत कापसाला भाव मिळत होता. चालू आठवड्यात कापसाच्या भावात घसरण झाली आहे. या आठवड्यात महाराष्ट्रात सरासर कापसाला भाव ७ हजार ७०० ते जास्तीत जास्त ८ हजार १०० पर्यंतच कापसाला भाव मिळत आहे.
कापसाच्या भावात मोठी नरमाई
सुरुवातीपासून आलेला कापसाची साठवण शेतकऱ्यांनी केली आहे. याचे मुख्य कारण, मागील वर्षी जानेवारी महिन्यात ११ हजार तसेच १२ हजार पर्यंत प्रति क्विंटल भाव मिळाला होता. याही वर्षी कापसाला अश्याच प्रकारे भाव मिळेल असे सांगण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस हा रोखून ठेवला आहे.
कापसाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. यावर्षी महागाई वाढल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक खर्च कापूस लागवड करण्यासाठी लागला आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने कापूस आयात केला नव्हता. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढली होती. जगात कापसाचा वापर ३० ते ३५ टक्कांनी वाढला आहे.
मागील वर्षी कापसाला १३ हजार ते १५ हजार पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी कापसाची लागवड हि मोठ्या प्रमाणात केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार २.२३ लाख हेक्टर वरती कापसाची लागवड होती पण मुसळधार पाऊस झाल्याने १ लाख हेक्टर वरील कापसाच्या पिकाचे नुकसान झालेल समोर आले आहे. यावरुन जांणकार सांगतात की, यावर्षी सुध्दा कापसाचे उत्पादन हे कमी असणार आहे.
👀👇👇👇👀
१३ फेब्रुवारी पासून कापसाच्या भावात तेजी येणार
१३ फेब्रुवारी पासून कापसाचे वायदे बाजार सुरु होणार असून एकीकडे व्यापारी आपला अंदाज बांधत आहे. मिळालेल्या माहिती नुसार १३ फेब्रुवारी पासून कापसाच्या भावात सुधारणा होणार पण कापसाचे भाव हे स्थिर राहतील यांचा अंदाज बांधणे कठीण आहे.
जांणकरांच्या मते, देशातच कापसाची मागणी हि मोठ्या प्रमाणात आहे. सुतगिरण्या आणि इतर कंपन्याना कापसाची गरज आहे. देशात कापूस उत्पादक शेतकरी एकजूट पाहयला मिळत आहे. त्यामुळे अनेक बाजार समिती मध्ये कापसाची आवक मोठ्या प्रमाणात येत नाही. आता शेतकरी कमी भावात कापसाची विक्री करणार असे चित्र पाहयला मिळत आहे.
👀👇👇👇👀
वरील बातमी तुम्हाला आवडली असेल तर आताच आमच्या WhatsApp ग्रुप वर जॉईन व्हा.