Cotton Prices Increased Today : आज या बाजार समिती मध्ये कापसाचे भाव वाढले

Cotton Prices Increased Today : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्रात सरासरी कापसाला दर ७३०० ते ८५०० पर्यंत मिळाला आहे. जाणंकारांच्या मते कापसाच्या दरात आपणास दररोज चढउतार पाहयला मिळणार त्यामुळे शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक बाजाराचा आढाव घेऊनच कापूस विक्री करावा. 

Cotton Prices Increased Today
Cotton Prices Increased Today

आज कापसाचे भाव वाढले ( Cotton prices increased today )

सावनेर बाजार समिती मध्ये आवक वाढलेली आहे. या बाजार समिती मध्ये १२ तारखेला ३८०० आवक आणि आज १६ तारखेला ४७०० पर्यंत आवक पोहचली आहे. गेल्या पाच दिवसात सावनेर बाजार समिती मध्ये कापसाच्या दरात बदल झालेला पाहयला मिळाना नाही. १२ ताखेपासून ते १६ जानेवारी पर्यंत कमीत कमी दर ८१००, जास्तीत जास्त दर ८२५०, सर्वसाधरण दर ८३५० अश्या प्रकारे कापसाला दर मिळत आहे. 

मनवत बाजार समिती मध्ये आवक वाढली तसेच गेल्या दोन दिवसात कापसाच्या दरात आज सुधारणा झालेली पाहयला मिळाली आहे. या बाजार समिती मध्ये १४ जानेवारी तारखेला ११०० आवक होती तसेच आज १६ जानेवारी तारखेला १४०० इतकी आवक आतापर्यंत आली आहे. मनवत बाजार समिती मध्ये गेल्या दोन दिवसात ( १४ तारखेपासून ते १६ जानेवारी तारखेपर्यंत ) कमीत कमी दरात २०० रुपायांनी कमी झाले, तसेच जास्तीत जास्त दरात ५० रुपायांनी वाढ, सर्वसाधरण दरात १५० रुपायांनी कमी झाले आहेत. आज ( १६ जानेवारी ) मनवत बाजार समिती मध्ये कमीत कमी दर ७४००, जास्तीत जास्त दर ८४७०, सर्वसाधरण दर ८२५० पर्यंत कापसाला दर मिळाला आहे.

कापसाचे भाव उतरले 

राजूरा बाजार समिती मध्ये आवक वाढली पण दरात मोठी घसरण झालेली पाहयला मिळाला आहे. राजूरा बाजार समिती १५ जानेवारी तारखेला १६१ आवक होती पण आज १६ तारखेला ११८ पर्यंत आवक पोहचली आहे. राजूरा बाजार समिती मध्ये कमीत कमी दरात ८०० रुपये, जास्तीत जास्त दरात २५ रुपये आणि सर्वसाधरण दरात ४१२ रुपयांनी आज १६ जानेवारी तारखेला घसरण पाहयला मिळाली आहे. आज १६ जानेवारी कमीत कमी दर ८१००, जास्तीत जास्त दर ८२००, सर्वसाधरण दर ८१५० राजूरा बाजार समिती मध्ये कापसाला इतका दर मिळाला आहे.  

Leave a Comment