Cotton Rate : दसरा आणि दिवाळीच्या आधीच कापसाच्या दोन वेचण्या होण्याची शक्यता

Cotton Rate : राज्यात कापसाची लागवड कमी प्रमाणात झाली आहे. त्यातच राज्यात पावसामुळे काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यात वेळेवर पाऊस नसल्याने कापसाच्या झाडाचे ( Cotton Plant ) आगरे सुध्दा गळून पडले होते. जाणकारांच्या मते महाराष्ट्रात दसरा आणि दिवाळी पर्यंत पावसाने हजेरी नाही लावल्यास तर कापसाच्या दोन वेचण्या होण्याची दाट शक्यता आहे. तसेच यावर्षी कापसाचे ( Cotton ) उत्पादन कमी होण्याचा अंदाज सुध्दा आहे.
Cotton Rate
विदर्भ आणि खानदेशात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. तसेच यावर्षी खानदेशात आणि विदर्भा मध्ये अतिमुसळधार पावसाने कापसाचे नुकसान ( Damage To Cotton ) केले आहे. महाराष्ट्रात सुमारे ४२ लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर कापसाची केली जात आहे. चीन, अमेरिका आणि ब्राझिल या इतर देशापेक्षा जास्त कापसाची लागवड भारतात करण्यात आली आहे. यावर्षी भारतात १२७ लाख हेक्टर पेक्षा जास्त कापसाची लागवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात १२७ हेक्टर पैकी फक्त पाच ते सहा टक्के क्षेत्र ओलिताखाली असल्यामुळे यावर्षी कापसाच्या गाठी ( Cotton Bales ) जास्तीत जास्त १०५ लाख गाठीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.राज्यात सरासरी २ हेक्टर मध्ये २ ते ३ क्विंटल कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे. २०११ ते आतापर्यंत गारपीट, दुष्काळ, मुसळधार पाऊस तसेच बोंड आळीचा ( Bond Worms ) प्रादभार्व सतत वाढत असल्यामुळे कापसच्या उत्पादनात घट पाहयला मिळत आहे. यावर्षी भारतात ३७५ लाख कापसाच्या गाठी तसेच महाराष्ट्रात १०० ते १०५ लाख पर्यंत कापसाच्या गाठी ( Cotton Bales ) होण्याचा अंदाज सांगण्यात येत असला तरी सुध्दा यंदाची स्थिती पाहता हा अंदाज सुध्दा बोगस ठरवू शकतो.

पावसामुळे आपल्या शेतातील कापसाचे नुकसान होऊ नये त्यामुळे शेतकरी लवकर कापूस ( Picking Cotton ) वेचणीची सुरुवात करत असतात. यावर्षी अंदाजेप्रमाणे दिवाळी आधीच दोन कापसाच्या वेचण्या होऊ शकतात. अचानक वातावरणात बदल तसेच बोंड आळीचा प्रादभार्व वाढला तर कापूस वेचणी कमी होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर मध्ये कापसावर मोठ्या प्रमाणात बोंड आळीचा प्रादभार्व पाहयला मिळत आहे. तसेच कोरडवाहू जमिनीवर बोंड आळीचा प्रादभार्व अधिक पाहयला मिळत आहे. 

Leave a Comment