Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकऱ्यांन मध्ये आंनदाचे वातावरण निर्माण होणार आहे. कापसाची शेती करणारे शेतकरी भारतात मोठ्या प्रमाणात आहे. पण गेल्या काही वर्षापासून भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस लागवड करण्यापासून आपली पाठ फिरावली आहे.
Cotton Rate |
यंदाही राहणार कापसाला भाव
संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापसाची शेती करणारे शेतकरी आहेत. पण गेल्या मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात कापूस लागवड कमी झाली होती. सतत कापसावरती बोंडआळीचा प्रादर्भाव आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. असे इत्यादी कारणे आहेत ज्यामुळे शेतकरी कापूस लागवड करण्यापासून आपली पाठ फिरवत आहे. पण मागील वर्षी कापसाला तूफान भाव मिळल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस लागवड मोठ्या प्रमाणात केली असून सुध्दा कापासाचे भाव तूफान राहणार आहे. कारण याही वर्षी कापसावर मोठ्या प्रमाणात बोंडआळीचा प्रादर्भाव पाहयला मिळाला आहे. तसेच भारतात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे यंदाही कापसाचे उत्पादन कमी होणार असल्याचे चित्र पाहयला मिळत आहेत. काही जांणकरांच्या मते कापसाचे उत्पादन भारतात कमी झाले तर महाराष्ट्रातील कापसाला तूफान भाव मिळण्याची शक्यता जास्त आहे.
याही वर्षी असणार इतका भाव
आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत मागील मागील वर्षी कापसाच्या उत्पादनात मोठी घट पाहयला मिळली त्यामुळे भारतातील कापसाला चांगलीच मागणी वाढली होती. मागील वर्षी कापसाला, सुरूवातील ६००० भाव ते अंतिम टप्यात ११००० पेक्षा जास्त भाव मिळाला आहे. यार्षी अमेरिका आणि पाकिस्तान, बांग्लादेश असे इतर देशात मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे भारतातील कापसाला याही वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढणार असे जाणकारांचे मत आहे. तसेच कापसाला यावर्षी सुरुवातीला भाव ७००० ते अंतिम टप्यात १२००० पेक्षा जास्त भाव मिळणार असल्याचे संकेत दिसत आहे.