Cotton Rate : नवीन कापसाची आवक लवकरच बाजार समिती मध्ये येणार आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा तसेच या तीन राज्यात नवीन कापसाची आवक सुरु झाली आहे. कापसाचा नवीन हंगाम सुरु होताच, महाराष्ट्र, तेलंगणा तसेच आंध्रप्रदेश या राज्यात लिलावाची सुरुवात झाली आहे. पंजाब हरियाणा तसेच राजस्थान या राज्यात कापसाला सर्वाधिक मिळतो त्यामुळे व्यवहार अधिक होत आहे. परंतू भविष्यात सुध्दा असेच भाव टिकतील असा अंदाज बांधला जात आहे.
Cotton Rate 2023 | कापसाचे भाव वाढले ?
पंजाब, राजस्थान आणि हरियाणा या तीन राज्यात सरासर ७ हजार ४०० ते ७ हजार ७०० पर्यंत कापसाला भाव मिळत आहे. लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार २० रुपये असा प्रकारे हमी भाव दिला आहे. देशातील उर्वरित राज्यात जुन्या कापसाला ७ हजार पर्यंत भाव दिला जात आहे.
अमेरिका कृषी विभागाच्या मते, यावर्षी भारतात कापसाचे उत्पादन घटणार आहे. तसेच जागतिक पातळी वरहि कापसाचे आवक कमीच येणार आहे. अमेरिकासह भारतात कापसाचे उत्पादन घटणार असा उल्लेख मागील तीन वर्षापूर्वी केला होता. अमेरिका कृषी विभागाने दिलेल्या अपडेटनुसार, यावर्षी जागतिक पातळी वर तब्बल ६ टक्कांनी कापसाचे उत्पादन घटणार आहे. चीन आणि भारत देशात कापसाच्या उत्पादनात सतत्याने घट होत आहे.
कापसाचे उत्पादन का घटत आहे ?
देशात अनेक राज्यात अतिवृष्टी झाली उर्वरित राज्यात भंयकर दुष्काळ पडला आहे. बहूतांश राज्यात यावर्षी मॉन्सूनचे आगमन उशीरा झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाची लागवड उशीरा करावी लागली. पाऊस उशीरा पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केलीच नाही. तसेच जुलै महिन्यात पाऊस कमी झाला त्यानंतर ऑगस्ट महिन्यात संपूर्ण पणे पावसाचा खंडा राहिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पिके जळून गेली आहेत.
अनेक शेतकऱ्यांचे पिके आहेत. परंतू त्यावरती लाल्या रोग किंवा बोंड आळीचा प्रादर्भाव पाहयला मिळत आहे. तिसऱ्या स्थांनावर चीन तर दुसऱ्यावर स्थांनावर भारत या देशात कापसाचे उत्पादन कमी राहणार आहे.