Cotton Rate Live : कापसाचे भाव हे १० हजार होतील या आश्याने शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला आहे. पण डिंसेबर आणि जानेवारी महिन्यात कापसाचे भाव हे कमी जास्त होत राहिले काही बाजार समिती मध्ये कापसाचे भाव स्थिर होते. आता कापसाच्या भावात सतत घसरण दिसत असल्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Cotton Rate Live |
शेतकरी आता कापूस विक्रीसाठी काढत ( Cotton Rate Live )
डिंसेबर २०२१ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापसाच्या भावात तेजी आली तसेच जानेवारी महिन्यातच कापसाला १० हजार पेक्षा जास्त भाव अनेक बाजार समिती मध्ये भेटू लागला होता. पण यावर्षी गेल्या दोन महिन्यापासून कापसाचे भाव हे स्थिर सुध्दा राहत नाही तसेच कापसाच्या दरात आतापर्यंत तेजी सुध्दा आली नाही. शेतकऱ्यांची इच्छा होती की यावर्षी कमीत कमी कापसाला १० हजार तरी दर मिळावा पण यावर्षी कापसाला १० हजार भावा मिळेल याची शक्यता कमी झाली आहे.
रोज कापसाचे भाव जाणून घेण्यासाठी
महाराष्ट्रात सरासरी कापसाला भाव ७ हजार ५०० ते ८ हजार ३०० पर्यंत कापसाला भाव मिळत आहे. गेल्या दोन महिन्यापासून कापसाचे दर वाढतील या अश्याने कापूस घरात होता. कापसाच्या भावात सुधारणा होत नसल्याने आता खेड्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी काढला आहे.
कापसाला भाव किती मिळेल
सुरुवातील कापसाला भाव १० हजार पेक्षा जास्त भाव मिळेल असा अंदाज शेतकरी लावत होते. कापूस विषयी अभ्यासक यांच्या मते आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे भाव हे वाढलेले नाही तसेच केंद्र सरकारने बाहेर देशातून मोठ्या प्रमाणात कापूस आयात केला आहे. पण देशात कापसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे कापसाला ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० पर्यंत कापसाला भाव मिळू शकतो.
👇👇👇👇👇