Cotton Rate Live : मराठवाड्यातील या जिल्ह्यातील कापसाचे भाव kapsache bhav

Cotton Rate Live : दरवर्षी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी कापसाची लागवड करत असतात. मिळालेल्या माहिती नुसार मराठवाड्यात, बाहेर राज्यातून सुध्दा कापूस खरेदी करण्यासाठी व्यापारी येतात. मराठवाड्यात कापसाला कश्याप्रकारे या आठवड्यात दर मिळतो याबाबत सविस्तर माहिती देणार आहे.

परभणी कापसाचे भाव २०२३

परभणी बाजार समिती या आठवड्यात कापसाचे भाव स्थिर पाहयला मिळाले आहे. १३ जानेवारी पासून ते १६ जानेवारी पर्यंत कापसाच्या दरात जवळपास ५ रुपयांनी वाढले आणि कमी सुध्दा झाले आहे. परभणी बाजार समिती मध्ये कापसाचे भाव १३ जानेवारीला कमालीचा दर ८४०५ प्रति क्विंटल होता तर १६ जानेवारीला ८४१० प्रति क्विंटल पर्यंत कापसाला कमालीचा दर मिळाला आहे.

मनवत कापसाचे भाव २०२३

मनवत बाजार समिती मध्ये जवळपास ४ दिवसात ६५ रुपायांनी कापसाचे दर वाढलेले आहेत. १३ जानेवारीला शेत मालाला कमालीचा दर ८४५५ प्रति क्विंटल होते तर १६ जानेवारीला शेत मालाला कमालीचा दर ८५२० प्रति क्विंटल होते.

‍किनवट कापसाचे भाव २०२३

किनवट बाजार समिती मध्ये मागील काही दिवसात २०० रुपायांनी कापसाच्या दरात घट पाहयला मिळाली आहे. किनवट बाजार समिती मध्ये १३ जानेवारी या तारखेला जवळपास ८३०० कमालीचा दर मालाला मिळाला पण दुसऱ्याच दिवशी १४ जानेवारीला कापसाच्या दरात २०० रुपायांनी घट होऊन, कमालीचा दर ८१०० प्रति क्विंटल कापसाला मिळाला आहे. 

Leave a Comment