Cotton Rate Live : महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतात कापसाचे भाव वाढत नसल्याने सर्व शेतकरी चिंतेत आहे. मागील आठवड्यापासून महाराष्ट्रात कापसाच्या दरात मोठी घसरण होत असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी कापूस विक्री करण्यापासून पाठ फिरवत आहे.
Cotton Rate Live |
कधी मिळेल कापसाला चांगला भाव ( Cotton Rate Live )
मागील वर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले होते तसेच केंद्र सरकारने कापूस आयात केला नव्हाता आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातील कापसाला चांगली मागणी होती. मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी कापसाला चांगला दर मिळेल अशी प्रतीक्षा शेतकरी करत आहे.
जांणकरांच्या मते यावर्षी काही कंपन्याच्या अंदाजानुसार यावर्षी कापसाचे उत्पादन कमी होणार आहे. महत्वाचे म्हणजे चीनकडून मोठ्या प्रमाणात कापसाची होत असती पण यावर्षी चीन मध्ये कोरोनामुळे बाजारपेठेतील व्यापार हे मंदावले आहेत.
येणाऱ्या काळात जर चीनकडून कापसाची मागणी वाढली तर कापसाचे दर सुध्दा वाढतील. तसेच यावर्षी केंद्र सरकारने बाहेर देशातून कापूस आयात केल्यामुळे भारतातील बाजारपेठेत याचा थोडाफार परिणाम पाहयला मिळेल.
महाराष्ट्रातील कापसाला थेट आंतराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी
१) महाराष्ट्रातील कापूस हा लांब धाग्याचा असल्यामुळे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अश्या कापसाला चांगलीच मागणी येत आहे.
2) ऑस्ट्रेलिया तसेच जपान, रशिया मधून सुध्दा कापसाला तूफान मागणी आहे तसेच चीनकडून सुध्दा मागणी आली अशी सूत्राकडून माहिती कळाली आहे.
३ लाख मजूरावर उपासमारीची वेळ
500 ते ६०० जिनिंग मध्ये ३ लाखा पेक्षा जास्त मजूर काम करत आहेत. महाराष्ट्रातील कापसाला आंतराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे पण महाराष्ट्रातच कापसाची कमतरता आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवल्यावर या ३ लाख मजूरावर उपासमारीची वेळ येऊ शकते.
1) महाराष्ट्रात जवळपास कापसावर पक्रिया करणारे ८० टक्के जिनिंग बंद पडले आहेत.
2) सध्याच्या परिस्थिती महाराष्ट्रात २० टक्के जिनिंग सुरु आहेत.
३) महाराष्ट्रात सध्या जवळपास ५०० पर्यंत जिनिंग सुरु आहेत.
शेतकऱ्यांनी कापसाची विक्री का थांबवली ?
या आठवड्यात कापसाचे दर हे काही बाजार समित्यामध्ये स्थिरावले आहे. सरासरी पाहता महाराष्ट्रात कापसाला ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्यास पाठ फिरावली आहे. घरातच शेतकरी आता कापसाची साठवणू करत आहे. शेतकऱ्यांच्या मते मागील वर्षी १३ हजार पेक्षा जास्त दर कापसाला मिळाला होता पण यावर्षी कमीत कमी १० हजार पेक्षा जास्त दर हा कापसाला मिळाला पाहिजे.