Cotton seeds : कापूस बियाणे या कंपन्या मध्ये मिळतात || किती प्रकारचे कापूस बियाणे तसेच त्याचे वैशिष्ट्ये जाणून घ्या

Cotton seeds : भारतात किती कंपन्या आहेत ज्या कापूस बियाणे विक्रीसाठी काढतात. कापूस बियाणे किती प्रकारचे आहे. या कापूस बियाण्याचे काय वैशिष्ट्य आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी खाली वाचा.
Cotton seeds : कापूस बियाणे या कंपन्या मध्ये मिळतात || किती प्रकारचे कापूस बियाणे तसेच त्याचे वैशिष्ट्ये जाणून घ्या
Cotton seeds : कापूस बियाणे या कंपन्या मध्ये मिळतात || किती प्रकारचे कापूस बियाणे तसेच त्याचे वैशिष्ट्ये जाणून घ्या

कापूस बियाण्याचे किती कंपन्या ‌| Cotton seeds 

1 ) अंकूर सीडस् प्रा.लि
2 ) पालमूर सीड
3 ) अजित सीड प्रा.लि.
4 ) जे.के अॅग्री जेनेटिक्स लि.
5 ) राशी सोडस प्रा.लि.
6 ) यशोदा हायब्रीड सीडस प्रा. लि.
7 ) सनग्रो सीडस् प्रा.लि
8 ) नाथ बायोजिन्स
9 ) धनलक्ष्मी क्रॉप सायन्स प्रा.लि.
10 ) वेस्टर्न अॅग्री सीडस
11 ) न्युजिविडू सीडस् लि.
12 ) प्रभात अँग्री बायोटेक प्रा.लि.
13 ) प्रवर्धन सीडस् प्रा. लि.
14 ) तुलसी सीडस प्रा.लि.
15 ) सेंथील सीडस् प्रा.लि.
16 ) क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन
17 ) नवकार हायब्रीड सीडस्
18 ) निओ सीडस् इंडिया प्रा.लि.
19 ) कोहिनूर सीड फील्ड इंडीया प्रा.लि.
20 ) सीडवर्क इंटरनॅशनल प्रा. लि.
21 ) श्रीराम बायासिड जेनेटिक्स
22 ) बसंत अॅग्रोटेक इंडीया प्रा.लि.
23 ) गंगा कावेरी सीडस् प्रा.लि.
24 ) श्रीराम फर्टीलायझर
25 ) विभा अॅग्रोटेक लि.
26 ) बायर बायोसायन्स प्रा.लि.
27 ) मेटाहेलिक्स लाईफ सायन्स
28 ) सफल सीडस् अॅन्ड बायोटेक
29 ) श्रीरामा अॅग्री जेनेटिक्स प्रा.लि.
30 ) किर्तीमान ॲग्रो जेनेटिक्स लि.
31 ) कलश सीडस् प्रा.लि.
32 ) कृषिधन सीडस् प्रा.लि.
33 ) कावेरी सीड कं.लि.
34 ) महाराष्ट्र हायब्रीड सीडस् कं. प्रा.लि.
35 ) ग्रीनगोल्ड सीडस प्रा.लि.
36 ) टीयारा अॅग्रोटेक
37 ) अमर बायोटेक
38 ) श्री सत्या अॅग्री बायोटेक
39 ) जुआरी अॅग्री सायन्सेस
40 ) नर्मदा सागर अँग्री सीडस्
41 ) आर जे बायोटेक
42 ) नामधारी सीडस् प्रा.लि.

कापूस बियाण्याचे वैशिष्ट्ये

अंकूर सीडस् प्रा.लि
शेतकरी मित्रांनो अंकूर सीडस् प्रा.लि कंपनी मध्ये कापूस बियाणे कोणत्या प्रकारचे तसेच त्या बियाणे मध्ये कोणते वैशिष्ट्य आहे हे जाणून घेणार आहोत. 
खरीप हंगामातील कापूस बियाणे आहे. 
कापूस बियाणे
अंकूर सीडस् प्रा.लि कंपनी मध्ये 11 प्रकाराचे कापूस बियाणे मिळतात. 
1) अंकूर 3034 बीजी ||
‌Ankur – 3034 BG || हे कापसाचे उत्तम वाण आहे. यास मोठाले बोंडे ( कापसाचे वजन 5-5.5 ग्रॅम ) येतात. 
‌हे झाड दणकट असतात यांची उंची अमर्यादित तसेच पसरट झाड असतात.
‌कमी अंतरावर सुध्दा हे झाड चांगल्या प्रकारे येतात. या मध्ये दहिया रोग तसेच रसशोषक किड्यांचा जास्त प्रभाव होत नाही. 
‌हंगामात ओलिताखालील किंवा कोरडवाहू तसेच मध्यम ते भारी जमिनीत सुध्दा लागवडीसाठी उपयुक्त आहे.
2) अंकूर जय बीजी ||
‌Ankur – Jai BG || एकाच वेळी सर्वात जास्त बोंडे फुटणारे पहायला मिळतात. 
‌या कापसाच्या झाडावर रसशोषक किड्यांचा प्रभाव अत्यंत कमी होतो. 
‌कापूस झाडाला चांगल्याप्रकारे उंची तसेच जास्तीत जास्त फांद्या व पसरट झाड आहे. 
‌वैशिष्ट्ये म्हणजे लवकर फळ देते तसेच दुबार पिक वेळेस घेता येते. 
‌हंगामात ओलिताखालील किंवा कोरडवाहू तसेच मध्यम ते भारी जमिनीत सुध्दा लागवडीसाठी उपयुक्त आहे. 
3) अंकूर सूवर्णा बीजी ||
‌Ankur – Suwarna BG || कापूस वेचणी साठी अत्यंत सोपे जाते. 
‌एका बोंडाचे वजन जवळपास 5 ग्रॅम आहे. 
‌या पिंकाची कालावधी जवळपास 170 ते जास्तीत जास्त 175 दिवस लागतात. 
‌या कापसाच्या झाडावर रसशोषक किड्यांचा प्रभाव कमी जाणून येतो. 
‌हंगामात ओलिताखालील जमीन किंवा कोरडवाहू जमीन सुध्दा लागवड केली जाते. 
‌या झाडाची उंची अमर्यादित आहे तसेच हे झाड मजबूत व अर्ध पसरट असते. 
4) अंकूर 3244 बीजी ||
‌Ankur 3244 BG || या झाडाचे बोंडे मोठे असून वजन 6 ग्रॅम पर्यंत आहे. 
‌जास्तीत जास्त फांद्या तसेच जास्तीत जास्त बोंडे आणि अमर्यादित उंची ( पसरट झाड) आहे. 
‌रसशोषक किड्यांचा प्रभाव कमी तसेच कापसाची गुणवंत्ता उत्तम आहे. 
‌हंगामात ओलिताखालील किंवा कोरडवाहू तसेच मध्यम ते भारी जमिनीत सुध्दा लागवडीसाठी उपयुक्त 
5) अंकूर 3224 बीजी ||
‌Ankur 3224 BG || या पासून जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते. बोंड्याचे वजन जवळपास 5-5.5 ग्रॅम पर्यंत आहे. 
‌रसशोषक किड्यांचा प्रभाव कमी जाणवतो. 
‌हंगामात ओलिताखालील किंवा कोरडवाहू तसेच मध्यम ते भारी जमिनीत सुध्दा लागवडीसाठी उपयुक्त आहे. 
‌झाडांची मजबूती, दोन कांड्या मध्ये अंतर कमी असते तसेच जास्तीत जास्त उंची व अर्ध पसरट झाड आहे. 
6) अंकूर 3228 बीजी ||
‌Ankur 3228 BG || मोठाले बोंडे ( वजन 5-5.5 ग्रॅम) असतात. 
‌या झाडाला जास्तीत जास्त लांब फांद्या असतात. 
‌कोरडवाहू जमीन, ओलिताखालील जमीन, मध्यम ते भारी जमिन वर सुध्दा चांगल्याप्रकारे पिक घेता येते. 
‌जास्तीत जास्त उत्पादन घेता येते. 
‌या झाडाची उंची अमर्यादित ( अर्ध-पसरट) वाढते. 
‌हंगामात ओलिताखालील किंवा कोरडवाहू तसेच मध्यम ते भारी जमिनीत सुध्दा लागवडीसाठी उपयुक्त आहे.
 
7) अंकूर पुष्कर बीजी ||
‌Ankur Pushkar BG || इतर परीस्थिती सुध्दा लागवडीसाठी योग्य ठरते. 
‌हे झाड शेवटच्या वेचणी पर्यंत झाड हिरव गार राहते. 
‌या झाडाचे बोंडे जवळ जवळ असतात. 
‌या झाडाची उंची अमर्यादित तसेच दणकट झाड असते. 
‌हंगामात ओलिताखालील किंवा कोरडवाहू तसेच मध्यम ते भारी जमिनीत सुध्दा लागवडीसाठी उपयुक्त आहे. 
8) संकरित अंकूर किर्ती बीजी ||
‌Ankur Kirti BG || या झाडाच्या बोंडाचे वजन 6 ग्रॅम पर्यंत आहे. 
‌रसशोषक किड्यांचा प्रभाव कमी जाणवतो. 
‌हे झाड दणकट व उंच अमर्यादित असते. 
‌हंगामात ओलिताखालील किंवा कोरडवाहू तसेच मध्यम ते भारी जमिनीत सुध्दा लागवडीसाठी उपयुक्त आहे. 
9) अंकूर स्वदेशी 5 ||
‌Ankur Swadeshi 5 || या पिकाचा कालावधी कमीत कमी 160 ते जास्तीत जास्त 180 पर्यंत आहे. काही पिकांचा कालावधी वाढतो. 
‌बोंडाचे वजन जवळपास 4 ग्रॅम असते. 
‌या झाडाच्या पानांचा रंग गर्द दिसून येतो. 
‌मोठाले बोंडे तसेच रुईचा उतारा जास्त असतो. 
जिरायती व बागायती जमीन वर उपयुक्त ठरते. 
10) अंकूर अजय प्लस 3224 बीजी ||
‌Ankur Ajay + 3224 BG || झाड उंच, दणकट असते. 3 पर्यंत याला फांद्या असतात. 
‌उत्पादन चांगल्याप्रकारे देते. 
‌बोंडाचे वजन जवळपास 4.5 ग्रॅम पर्यंत आहे. 
‌रसशोषक किड्यांचा प्रभाव कमी होतो. 
11) संकरित अंकूर 3028 बीजी ||
‌Ankur 3020 BG || या झाडाला एकाच वेळी जास्तीत जास्त बोंडे येण्याची शक्यता आहे. तसेच वजनदार कापूस असतो. 
‌हे झाड शेवटच्या वेचणी पर्यंत हिरव गार राहते. 
‌दुबारा पिक घेण्यास विलंब कमी होतो. 
‌कोरडवाहू जमीन तसेच हंगामात ओलिताखालील जमीन वर सुध्दा पिक घेण्यास उपयुक्त ठरते. 
अंकूर सीडस् प्रा.लि २७,
नवी कापूस बाजाराचा लेआऊट , 
नागपूर ४४००१८ महाराष्ट्र
अधिक माहिती साठी संपर्क
अजित सीड प्रा.लि.
Ajeet Seeds कंपनी मध्ये 11 प्रकारचे तुम्हाला कापूस बियाणे मिळतील.

अजित 111 BG ||

‌अजित 111 BG || या कापूस बियाणे पासून पावसाच्या आधारावर पिक घेतले जाते. तसेच बागायती लागवडीसाठी उपयुक्त ठरत आहे.

‌बोंडे मोठाले बोंड्याचे वजन 6 ग्रॅम पर्यंत असतात.

‌रसशोषक किड्यांचा व लाल्या रोगाचा प्रादुर्भाव कमी जाणवतो. परिपक्व कालावधी 140 ते 155 दिवस लागतात.

‌जिनिंग 38.5℅ पर्यंत, स्टेपल लांबी 30 ते 31 मिमी, झाडांची उंची 135 ते 150 cm. सेमी.

अजित – 11 BG ||

‌Ajeet – 11 BG || या ( हायब्रीड पर्जन्य) कापूस बियांचे वैशिष्ट्य म्हणजे पाणी टंचाईच्या परिस्थितीत सुध्दा चांगल्याप्रकारे पिक येते. बागायती लागवडीसाठी उपयुक्त ठरत आहे.

‌कमी वेळात पिक घेतले जाते व दुहेरी पिक घेण्यासाठी मदत होते.

‌मोठ्या बोंड्याचे वजन 5 ग्रॅम पर्यंत असते.

‌लाल पान व रसशोषक किड्यांचा प्रभाव कमी होते. कापसाच्या झाडाची उंची 150 सेमी. पर्यंत जाते.

‌परिपक्व कालावधी 140 ते 150 दिवस लागतात. मुख्य लांबी 29 मिमी पर्यंत

अजित 199 बीजी ||

‌Ajeet 199 BG || पावसाच्या आधारित पिक घेतले जाते.

‌उत्तम फायबर गुण, मोठ्या आकाराचे बोंडे असतात.

‌या झाडाची उंची जवळपास 160 पर्यंत जाते तसेच पिकाचा कालावधी 140-150 दिवस लागतात.

‌बोंड्याचे वजन 6 ते 6.5 ग्रॅम पर्यंत, जिनिंग 37.8-38℅ पर्यंत आहे. मुख्य लांबी 29.5 ते 30 मिमी.

‌रसशोषक किड्यांचा प्रभाव कमी असतो.

अजित 155 बीजी || 

Ajeet 155 BG || बागायती लागवडीसाठी उपयुक्त व पावसाच्या आधारावर पिक घेतले जाते.

परिपक्व कालावधी 140 ते 150 दिवस लागतात. 

यावर रसशोषक किड्यांचा प्रभाव कमी होतो.

या झाडाची उंची 140 ते 155 पर्यंत वाढते. 

बोंड्याचे (वजन 5.5 ते 5 ग्रॅम ) आकार मोठाले असतात.

जिनिंग 37 ते 38℅ पर्यंत आहे व मुख्य लांबी जवळपास 28.5 ते 29.5 मिमी आहे.

अजित 104 बीजी ||

Ajeet 104 BG || कमी वेळेत पिक घेऊन दुबार पिक घेता येते. परिपक्व कालावधी 135 ते 145 दिवस लागतात.

कीटकांचा प्रभाव कमी जाणून येतो. 

पावसाच्या आधारावर व बागायती लागवडीसाठी उपयुक्त.

झाडे मजबूत तसेच यांची उंची 130 ते 150 सेमी असते.

बोंड्याचे वजन 6.5 ते 7 ग्रॅम पर्यंत असते.

अजित 177 बीजी ||

Ajeet 177 BG || सिंचनाच्या (पावसाच्या) आधारावर पिक घेतले जाता येते.

साधारणपणे झाडाची उंची 145 ते 160 सेमी असते.

बोंड्याचे वजन 6 ग्रॅम ते 6.5 ग्रॅम पर्यंत आहे. 

कीटकांचा प्रभाव कमी जाणून येतो.

परिपक्व कालावधी साधारण 145 ते 160 दिवस लागतात.

अजित 133 बीजी ||

Ajeet 133 BG || या झाडाची उंची सुमारे 140 ते 150 सेमी असते.

बोंडे मोठाले व त्यांचे वजन 4.5 ते 5 ग्रॅम पर्यंत आहे.

परिपक्व कालावधी 145 ते 155 पर्यंत आहे.

कीटकांचा प्रभाव कमी जाणून येतो. 

बागायती लागवडीसाठी तसेच पावसाच्या आधारावर पिक घेता येते.

अजित 33 बीजी ||

Ajeet 33 BG || ओलिताखालील क्षेत्र तसेच पावसाच्या आधारावर पिक घेता येते.

कीटकांचा प्रभाव कमी जाणून येतो.

परिपक्व कालावधी 140 ते 155 दिवस लागतात आणि बोंड्याचे वजन 4 ते 4.5 ग्रॅम पर्यंत आहे.

या झाडाची उंची सुमारे 160 सेमी असते.

अजित 1 बीजी ||

Ajeet 1 BG || ओलिताखालील क्षेत्र तसेच पावसाच्या आधारावर पिक घेता येते.

परिपक्व कालावधी 140 ते 160 दिवस लागतात. 

कीटकांचा प्रभाव कमी जाणून येतो.

मोठाल्या बोंड्याचे वजन 5 ते 5.5 ग्रॅम पर्यंत आहे. 

झाडाची उंची सुमारे 150 सेमी असते.

अजित 5 बीजी ||

Ajeet 5 BG || पावसाच्या आधारावर पिक घेता येते.

मोठाल्या बोंड्याचे वजन 6 ते 6.5 ग्रॅम पर्यंत आहे. 

कीटकांचा प्रभाव कमी जाणून येतो.

कमी दिवसात ( कालावधी 130 ते 140 ) पिके घेतली आहेत.

झाडाची उंची सुमारे 120 ते 125 सेमी असते.

अजित 6 बीजी ||

Ajeet 6 BG || कमी दिवसात ( कालावधी 135 ते 145 ) पिके घेतली आहेत. दुबार पिक घेण्यासाठी सोपे जाते.

पावसाच्या आधारावर पिक घेता येते. 

झाडाची उंची सुमारे 110 ते 125 सेमी असते.

मोठाल्या बोंड्याचे वजन 4.5 ते 5 ग्रॅम पर्यंत आहे. 

कीटकांचा प्रभाव कमी जाणून येतो.

सिंचनाच्या (पावसाच्या) आधारावर पिक घेतले जाता येते.

अधिक माहिती संपर्क साधा
गट क्र. 233, जिल्हा : औरंगाबाद 431105, तालुका : पैठण, चितेगाव

 

जे.के अॅग्री जेनेटिक्स लि.

 

JK agri कंपनी मध्ये 6 प्रकारचे कापूस बियाणे मिळतात.
JK 9501 BG || 
JK 9501 BG || उत्पादन क्षमता 31 ते 35 क्विंटल उत्पादन मिळते. 
60 दिवसात झाडाला फुले येण्यास सुरुवात होते. 
परिपक्व कालावधी 150 ते 160 सुमारे दिवस लागतात. 
बोंडे मोठाले तसेच 5.8 ते 6 ग्रॅम पर्यंत वजन असते. 
झाडाची उंची सुमारे 190 सेमी पर्यंत असते. 
रसशोषक किड्यांचा प्रभाव कमी असतो. 
JK Pass Pass BG || 
 

 JK Pass Pass BG || कमी वेळेत ( परिपक्व कालावधी 150 ते 160 दिवस) चांगले उत्पादन मिळते. 

उत्पादन क्षमता 32 ते 34 क्विंटल पर्यंत
बोंड्याचे वजन 5.2 ते 5.5 ग्रॅम
झाडाची उंची सुमारे 160 ते 180 सेमी
60 दिवसात 50℅ टक्के फुले येतात. 
JKCH 99 BG ||
JKCH 99 BG || उत्पादन क्षमता 32 ते 35 क्विंटल, परिपक्व कालावधी 150 ते 160 दिवस लागतात. 
बोंड्याचे वजन 5.8 ते 6 ग्रॅम पर्यंत
झाडाची उंची सुमारे 120 ते 190 सेमी पर्यंत आहे. 
किड्यांचा प्रभाव कमी होतो. 
JKCH 8940 BG || 
JKCH 8940 BG || उत्पादन क्षमता 32 ते 35 क्विंटल
बोंड्याचे वजन सुमारे 5.5 ते 5.8 ग्रॅम
झाडाची उंची सुमारे 160 ते 180 पर्यंत आहे. 
JK NAFAA BG ||
JK NAFAA BG || उत्पादन क्षमता 22 ते 25 क्विंटल
बोंड्याचे वजन 4.4 ते 4.8 ग्रॅम पर्यंत
परिपक्व कालावधी 160 ते 170 दिवस लागतात. 
झाडाची उंची सुमारे 200 सेमी पर्यंत. 
JK CHAMUNDI BG ||
JK CHAMUNDI BG || उत्पादन क्षमता जवळपास 22 ते 25 क्विंटल
परिपक्व कालावधी 160 ते 170 दिवस लागतात 58 दिवसात झाडाला फुले येण्याची सुरूवात होते. 
बोंड्याचे वजन 4.4 ते 4.8, झाडांची उंची 170 ते 180 सेमी पर्यंत. 
अधिक माहितीसाठी संपर्क येथे
जे.के अॅग्री जेनेटिक्स लि.
1-10-177, चौथा मजला, वरुण टाॅवर्स, बेगमपेट
हैदराबाद 500016,
राशी सीड्स प्रा.लि.
राशी सीड्स प्रा.लि. या कंपनी मध्ये 15 प्रकारचे कापूस बियाणे मिळतात. 
Rasi NEO
Rasi NEO सध्या महाराष्ट्रात या कापूस बियांची मागणी आहे. 
NEO झाडांची उंची चांगल्याप्रकारे वाढते तसेच बोंड्याचे आकार मोठाले असतात. 
Rasi MAGAN 
Rasi MAGAN किटकांचा प्रभाव कमी तसेच बोंड्याचे वजन चांगल्याप्रकारे असते. 
कमी वेळात पीक घेता येते. 
BUMBAC
Rasi BUMBAC कापुस वेचणी साठी सोपे. 
एकाचवेळी जास्त बोंडे येतात. 
कर्नाटक आणि मध्यप्रदेश मध्ये जास्त लागवड केली जाते. 
RCH 779 
Rasi RCH 779 यावरती किटकांचा प्रभाव कमी होतो. 
जास्तीत जास्त कमी वेळात पीक घेता येते. 
RCH 668
Rasi RCH 668 कमी अंतरावर सुध्दा लागवड करण्यासाठी उपयुक्त. 
किटकांचा प्रभाव कमी असतो. 
आंध्र व तेलंगणा मध्ये मागणी आहे. 
XL 708
Rasi XL 708 किटकांचा प्रभाव कमी तसेच कर्नाटक राज्यात मागणी आहे. 
RCH 650
Rasi RCH 650 बोंड्याचे आकार मोठाले असतात तसेच पंजाब, हरियाणा, राजस्थान मध्ये मागणी आहे. 
RCH 773
Rashi RCH 773 किटकांचा प्रभाव कमी असतो. 
पंजाब व हरियाणा राज्यात लागवड केली जाते. 
RCH 776
Rashi RCH 776 राजस्थान, पंजाब, हरियाणा राज्यात लागवड केली जाते. 
RCH 602
Rashi RCH 602 राजस्थान, पंजाब, हरियाणा राज्यात लागवड केली जाते. 
पाण्याच्या टंचाई परिस्थिती पिक चांगले येते. 
RCH 134
Rashi RCH 134 कमी वेळात पीक घेता येते तसेच दुसऱ्या पिक घेण्याची तयारी करता येते. 
Super 773
Rashi Super 773 राजस्थान मध्ये सर्वात जास्त लागवड केली जाते. 
Jet 
Rash Jet राजस्थान मध्ये सर्वात जास्त मागणी आहे. 
कमी वेळात पीक घेता येते तसेच दुसऱ्या पिक घेण्याची तयारी करता येते. 
RCH 659
Rashi RCH 659 महाराष्ट्र धरुन 6 राज्यात या बियाची मागणी आहे. 
RCH 2 BG
Rashi 2 BG 26 वर्षापासून शेतकऱ्यांचा यावर विश्वास आहे. 
महाराष्ट्रात अनेक राज्यात सुध्दा याची लागवड केली जाते. 
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क
राशी सीड्स प्रा.लि. 174,
सत्य मूर्ती रोड, रामनगर
कोईम्बतूर 641009, तामिळनाडू
नाथ बायोजिन्स
नाथ बायोजिन्स या कंपनीमध्ये दोन प्रकारचे कापूस बियाणे मिळतात. 
संकेत
संकेत कापूस बियांचे दोन वर्षांत चांगले परिणाम दिसले आहे. 
किटकांचा प्रभाव कमी जाणून येतो. 
यास मोठाले बोंडे येतात. 
दक्षिण
दक्ष पावसाळ्याच्या आधारावर पिक घेण्यास उपयुक्त आहे. 
किटकांचा प्रभाव कमी जाणवतो. 
कापूस वेचणी साठी सोपे. 
धनलक्ष्मी क्रॉप सायन्स प्रा.लि.
धनलक्ष्मी क्रॉप सायन्स प्रा.लि. या कंपनी मध्ये जवळपास 3 प्रकारचे कापूस बियाणे मिळतात. 
Cotton Hybrid 25D33 BG || Seeds
Cotton Hybrid 25D33 BG || हरियाणा आणि पंजाब मध्ये या बियाण्याची मागणी आहे. 
चांगल्या प्रकारे उंच झाड होते तसेच बोंड्याचे वजन जवळपास 6 ग्रॅम पर्यंत भरते. 
प्रति हेक्टरी उत्पादन क्षमता 30 ते 35 क्विंटल पर्यंत आहे. 
Cotton Hybrid ZCH-511 BG || Seeds
Cotton Hybrid ZCH-511 BG || Seeds गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यात लागवड केली जाते. 
प्रति हेक्टरी उत्पादन क्षमता 30 ते 32 क्विंटल
बोंड्याचे वजन : 6 ते 6.5 ग्रॅम
Cotton Hybrid D551 BG || Seeds
Cotton Hybrid D551 BG || Seeds चांगल्याप्रकारे झाडांची व्यवस्थापन केल्यास प्रति हेक्टरी उत्पादन क्षमता 30 ते 32 क्विंटल मिळते. 
परिपक्व कालावधी 160 दिवस लागतात तसेच झाडांची उंची चांगल्याप्रकारे असते. 

वेस्टर्न अॅग्री सीडस

वेस्टर्न अॅग्री सीडस कंपनी मध्ये 7 प्रकारचे कापूस बियाणे मिळतात.

Western Export BG || cotton

याचा मराठीतून अर्थ पश्चिम निर्यात बीजी || कापूस असा होतो. 

सिंचन तसेच पावसाळ्याच्या आधारावर पिक घेतले जाते. 

या झाडाच्या बोंड्याचे वजन 5.5 ग्रॅम पर्यंत भरते तसेच उत्पादन क्षमता 15 ते 31 क्विंटल कापूस होतो.

Western Kasturi 666 BG || 

पश्चिम कस्तुरी 666 बीजी || या कापूस बियाणे खुपच भारी आहे, 40 ते 60 दिवसात 50℅ झाडांना फुले येतात.
बोंड्याचे वजन जास्तीत जास्त 5 ग्रॅम पर्यंत भरते.

Western Nirogi 555 BG || 

पश्चिम निरोगी 555 बीजी || यावरती किटकांचा प्रभाव कमी असतो. 

उत्पादन क्षमता चांगली आहे. 

मोठ्या आकाराचे बोंडे येतात.

Western Nirogi 108 BG || 

पश्चिम निरोगी 108 बीजी || या झाडाची उंची 150 सेमी पर्यंत असते. 

बोंड्याचे वजन 5 ग्रॅम पर्यंत असते. 

कमी वेळात ( परिपक्व कालावधी 111 ते 125 ) जास्तीत जास्त उत्पादन देते.

Western Kasturi 555 BG || 

पश्चिम कस्तुरी 555 बीजी || फक्त 60 दिवसात झाडांना फुले येण्यास सुरुवात होते. 

कमी वेळात ( परिपक्व कालावधी 110 ते 115 ) जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते.

Western Nirogi 151 BG || 

पश्चिम निरोगी 151 बीजी || मोठ्या आकाराचे बोंडे तसेच एकाच वेळी जास्तीत जास्त कापूस जास्त येतो.
किटकांचा प्रभाव कमी जाणून येतो.

Western Nirogi 51 BG || 

पश्चिम निरोगी 51 बीजी || कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन, मोठाले बोंडे मिळतात. 

60 दिवसात 50℅ झाडांना फुले येतात. 

रोगाचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क
वेस्टर्न अॅग्री सीड्स लिमिटेड 802/11
वेस्टर्न हाऊस, वेस्टर्न रोड,
सेक्टर 28, गांधीनगर गुजरात.
( वरील सर्व माहिती google वरील सर्व कंपन्याच्या अधिकृत वेबसाईटवरून मिळवली असली तरीही आपला बळीराजा या बियांण्याची पुष्टी करत नाही. )

Leave a Comment