Cow Milk Subsidy : महाराष्ट्रातील दूध सस्थांनी दूधाच्या दरात मोठी कपात केली होती. याच आक्रोश शेतकऱ्यांन मध्ये होता तसेच अधून मधून शेतकऱ्यांचे या बाबत आंदोलन झालेले चित्र पाहयला मिळत होते. हिवाळी आधिवेशाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने सर्वात महत्वाचा निर्णय घेतला. दूध उत्पादक शेतकऱ्यांनसाठी आनंदाची बातमी, प्रति लिटर दूधासाठी राज्य सरकार आता ५ रुपये अनुदान जाहिर केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा दूध संघ आणि गोकूळ संघाना या मध्ये १७ कोटी पर्यंत अनुदान मिळणार आहे. गायीचे दूध परवडत नसल्याने या संघाने दूधाच्या दरात कपात केली होती यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आनंदोनल अधून मधून पाहयला मिळत होते.
एका बाजूने दुधाचे दर हे कमी होत होते तसेच दुसरी कडे जनावरांचा खर्च वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते होते. परंतू हि बाब सरकारन लक्षात घेता पुढील दोन महिने शेतकऱ्यांना ५ अनुदान प्रति लिटर मागे मिळणार आहे.