Crop Insurance : महाराष्ट्रात कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना पिक विमा लवकरच उपलब्ध होणार आहे. यावर्षी मराठवाड्यात मान्सून कमी बरसल्यामुळे सरकारने राज्यात दुष्काळ जाहिर कारावी अशी मागणी होत आहे. महाराष्ट्र शासनाने उर्वरित रक्कम ६१ कोटी ५२ लाख ३५ हजार ९८१ रुपये रक्कम विमा कंपन्यानकडे वितरीत करण्यात आले आहे. यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळणार आहे.
Weather Forecast : 25 सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाची सुरुवात
भारतीया कृषी विमा कंपनीने अर्ज सादर केला होता तसेच कृषी आयुक्तालयाच्या शिफारसीनंतर २०२२ खरीप हंगाम साठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत हप्ता कंपन्यानकडे वितरीत करण्यात आला आहे. हि रक्कम पाच पिक विमा कंपन्यानकडे पोहचली आहे. लवरच खरीप हंगाम २०२२ मधील शेतकऱ्यांना हि रक्कम वितरीत करण्यात येईल.
खालील पाच विमा कंपन्या | Crop Insurance
- भारतीय कृषी विमा कंपनी ( Agricultural Insurance Company of India )
- बजाज अलियान्झ जनरल इं. कं. लि. ( Bajaj Allianz General Ins. Co. Ltd.)
- एचडीएफसी इरगो जनरल इं. कं. लि. ( HDFC Irgo General Ins. Co. Ltd.)
- आयसीआयसीआय लोम्बार्ड जे.इं. ( ICICI Lombard J. Eng. )
- युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ( United India Insurance Company )
शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई कधी जमा होणार ?
अंदाजे, राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२२ पिक विमा काढला असेल अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता दाट आहे. महाराष्ट्रातील ५३ महसूल मध्ये पाऊस खुप कमी झाला आहे. जुलै महिना संपल्यानंतर मराठवाड्यात दुष्काळाचे सावट घोंघावत होत आहे. २१ दिवसापेक्षा जास्त कालावधीत पावसाचा खंड पाहलयला मिळाला आहे. अश्यातच पिक विमाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कृषि विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, खरीप हंगाम २०२२ मधील शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे.