Crop Insurance : नमस्कार, अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले चित्र पाहयला मिळतात. नांदेड जिल्ह्यात चार लाख ७३ हजार पेक्षा जास्त विमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीला नुकसानची माहिती ७२ तासात हि कळवली होती. आम्हाला मिळालेल्या महिती नुसार, नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत ९७ कोटी तसेच काढणीपश्चात ३ कोटी हे सर्व मिळून १०१ कोटीचा परतावा मंजूर केल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
Crop Insurance |
यावर्षी २०२२ मध्ये १० लाख ५७ हजार ५०८ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत खरीप हंगामात युनायटेड इंडिया जनरल Insurance कंपनीकडे आपले अर्ज भरवले होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत जवळपास ६ लाख ५१ हजार पेक्षा जास्त हेक्टर संरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी अतिवृष्टीची नोंद सुध्दा मोठ्या प्रमाणात झालेली समोर आली आहे.
प्रशासनाने नुकसानीचा दावा कंपनीकडे केल्यानंतर ४ लाख ७३ हजार ५७० विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसानची माहिती दिली होती. हि बाब कंपनीच्या लक्षात, कंपनीने पिकांचा पंचनामा करुन नैसर्गिक आपत्तीसाठी ९७ कोटी ९७ लाख तसेच काढणीपश्चात ३ कोटी २८ लाख असे एकून १०१ कोटीचा परतावा मंजूर झाला आहे. तसेच नुकसान भरपाईची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.