Crop Insurance | या शेतकऱ्यांना महत्वाची अपडेट | लवकरच नुकसान भरपाई खात्यावर जमा होणार

Crop Insurance : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पिक विमा भरतात जर पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना २५ टक्के पिक विमा आगाऊ दिला जातो.

Crop Insurance
Crop Insurance

मागील वर्षी खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेतंर्गत २५ टक्के पिक विमा आगाऊ मंजूर होता. पण यामध्ये ८५ टक्के शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पण उर्वरित शेतकऱ्यांना अजून सुध्दा मिळाला नाही.

Pik Vima 2023 Nanded 

खरीप हंगामात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ३६७ कोटीचा २५ टक्के आगाऊ पिक विमा मंजूर झाला होता. पण यामध्ये जवळपास ३६७ कोटी पैकी ३१० कोटी रुपये ८५ टक्के निधी वाटण्यात आला आहे. पण उर्वरित रक्कम कधी खात्यावर जमा होणार याची प्रतिक्षा शेतकरी पाहत आहे.

पिक विमा नांदेड २०२३

मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेतंर्गत पिक विमा मिळाला होता. पण यामध्ये १३ हजार ७५७ शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा झाला नाही. तांत्रिकी अडचणमुळे ५ कोटी २८ लाखाचा थकला आहे.

पिक विमा कधी जमा होणार 

मिळालेल्या माहिती नुसार, आधार कार्ड ज्या बँकेच्या खात्यावर लिंक असेल त्याच खात्यावर नुकसान भरपाई जमा होणार, तसेच हा पिक‍ विमा तांत्रिकी अडचणीमुळे थकला होता पण १० ते १२ दिवसात पिक विमा कंपनीकडून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम हि पाठवण्यात येणार आहे.

Leave a Comment