Crop Insurance : शेतकऱ्यांना ७२४ कोटी रुपायांची नुकसान भरपाई मिळणार! आला रे GR

Crop Insurance : शेती मध्ये शेतकरी काबाड कष्ट करतो पण त्यास निसर्ग हा कधी कधी साथ देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेती मधून मिळलेल्या उत्पादनाला सुध्दा योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हा नैराश्याकडे वळतो. 

Crop Insurance
Crop Insurance

शेतकऱ्यांना आधार किंवा आर्थिक मदत म्हणून राज्य सरकार व केंद्र सरकार विविध योजना राबवतात. शेती मध्ये नुकसान झाल्यास पिक विमा योजना या मध्यामतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. 

खरीप हंगाम पिक विमा ( Crop Insurance )

खरीप हंगामात पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना महत्वाची अपडेट, पिक विमा कंपनीच्या नियमानुसार ७२ तासाच्या आता नुकसान भरपाईची तक्रार हि करावी लागते. त्यानंतर सर्वेक्षण झाल्यानंतर नुकसानीचे पैसे मिळतील असे सांगण्यात येते. ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पिक विमा भरला असेल, अश्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यावर ७२ तासाच्या आत पिक विमा कंपनीकडे तक्रार केली असेल तर अश्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार असे पिक विमा कंपनीकडून सांगण्यात येत होते.

पिक विमाचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार केली तसेच आंदोलन सुध्दा करण्यात आले आहे. यासंदर्भात चौकशी झाल्यावर राज्य सरकारचा आणि केंद्र सरकाचा निधी हा पिक विमा कंपनीकडून वितरीत करण्यात आलाच नाही असे कंपनीकडून स्पष्टीकरण आले आहे. 

पिक विमा योजनेतंर्गत ७२४ कोटीचा निधी मंजूर

पिक विमा कंपनीने निधी वितरीत केला नाही, हि बाब राज्य सरकारच्या लक्षात आली. त्यानंतर राज्य सरकारने १३ जानेवारी या तारखेला ७२४ कोटी ५१ लाख ४६ हजार ८०९ रुपये निधी वितरीत करण्याबाबत शासन निर्णय काढला आहे. 

ज्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली नाही अश्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन देण्यात आले आहे. 

Leave a Comment