Pradhan Mantri Fasal Bima Yojana : पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दरवर्षी पाच कोटी पेक्षा जास्त अर्ज येतात. प्रधानमंत्री पीक विमा हि योजना जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुढील काही वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजना जगातील सर्वात मोठी तसेच प्रथम क्रमांकवर येण्याची शक्यता आहे.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana : |
केंद्रीय कृषी मंत्रीच्या माहितीनुसार, सहा वर्षात २५ हजार १८६ कोटीच्या हप्त्यावर शेतकऱ्यांना ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत १ लाख २५ हजार ६६२ कोटीची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षात पंतप्रधान पिक विमा योजनेवर शेतकऱ्यांचा विश्वास वाढला आहे. शेतकरी कल्याण मंत्रालयानच्या माहिती नुसार, २०१६ या वर्षी पंतप्रधान पिक विमा योजनाची सुरुवात झाल्यापासून २८३ टक्क्यांनी लहान शेतकरी, कर्जधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी यांचा समावेश झाला आहे. या योजनेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत आहे.
राज्य सरकारच्य माहितीनुसार, खरीप हंगामात २०२२ मध्ये ७९.५३ लाख अर्ज आले होते. यापैकी २८३ अर्जांमध्ये १०० रुपयापेक्षा कमी विम्याची रक्कम आहे. तसेच २१६०३ अर्जांमध्ये विम्याची हमीची रक्कम १००० रुपयांपेक्षा कमी आहे. विमासंरक्षित क्षेत्रफळामध्ये कमी असल्यामुळे काही प्रकारणांमध्ये अतिशय कमी असल्याचा दावा समोर येत आहे. यामुळे महाराष्ट्रातील राज्य सरकारने युनिक आयडीच्या आधारे सरसकट कमीत कमी १ हजार देण्याची तरतूद केली आहे. खरीपासाठी २ टक्के, रब्बी पिकासाठी १.५ टक्के, बागायतीसाठी ५ टक्के, व्यावसायिक ५ टक्के अशा प्रकारे शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे.
२०१६ ते २०१९ पर्यंत केंद्र सरकार व राज्य सरकार ५०:५० हप्ता भरत होते. पण २०२० पासून ते आतापर्यंत राज्य सरकार आणि केंद्र सरकार १०:९० प्रमाणे काम करत आहे.