Crop Insurance : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३ करीता शेतकऱ्यांनसाठी मोठी अपडेट पहा. दुष्काळ, पावसाचा खंड, कीड्यांचा प्रादर्भाव झाल्यास व सरासर सात वर्षाच्या तुलनेत ५० टक्के पेक्षा कमी उत्पादन झाल्यास तर प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून २५ टक्के आगावू रक्कम देण्याची तरदूत करण्यात आली आहे.
सोयाबीन पिकांची परिस्थिती पाहता, जिल्ह्याधिकारी गौडा जी. सी. यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २५ टक्के पर्यंत आगावू रक्कम देण्याचे आदेश ओरियंटल इन्शुरन्स विमा कंपनीला ( चंद्रपूर ) दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात उशीरा मान्सूनचे आगमन तसेच पिकांची लागवड उशीरा झाली आणि दीड महिना पावसाचा खंड यामुळे पिकांची परिस्थिती चांगली राहिल नाही त्यास सहमती विमा कंपनीने दाखवली आहे. सदर आदेशनुसार, १ महिन्याच्या आत सोयाबीन उत्पादक शेतकरी तसेच सर्व पीक विमाधारकांच्या खात्यात २५ टक्के आगावू रक्कम जमा करण्यात यावे. पिक काढणीनंतर जर नुकसान भरपाई मध्ये पात्र ठरल्या नंतर उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.