Crop Insurance : महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळ पडलेला आहे. तसेच सुरुवातीपासून पाऊस कमी पडला असल्यामुळे शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीचे संकट आले होते. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली होती. परंतू शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य सरकारने तब्बल ३५ लाख शेतकऱ्यांचा आग्रीम पिक विमा मंजूर केला आहे. लवकरच दिवाळीआधीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.
पीक विमा कधी मिळणार ? | Crop Insurance
एकमेव बीड जिल्ह्यात ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांनसाठी २४१ कोटीचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी हि माहिती सांगितली आहे. यावर्षी मान्सूनने उशीनरा आगमन केले तसेच कमी पाऊस पडला आणि विविध भागात पावसाचा मोठा खंड आहे. यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक झाली होती.
शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी राज्य सरकारने नुकसान भरपाई मंजूर केली आहे. तसेच शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळी आधीच हि रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ३५ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली तसेच १७०० कोटी पर्यंत पीक विमा मंजूर करण्यात आला आहे.