Crop Insurance Company : पावसाच्या कमतराता मुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले, पहिल्या टप्प्यात २५ टक्के मदतीचे आदेश दिली असूनहि मदतीस टाळाटाळ करत होते.
कंपनीच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी आपला संताप व्यक्त केलाला आहे.
पिकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांचा कडक इशारा | Crop Insurance
खरीप हंगामातील पिकांना प्रथम टप्प्यात २५ टक्के मदत देण्याचे आदेश दिले होते परंतू विमा कंपनी वारंवार टाळाटाळ असल्याचे चित्र दिसून येत होते. पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी दादा भूसे यांनी कडक इशारा दिलेला आहे.
पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आठ दिवसांच्या आत मदत देण्यास सुरुवात करावी असा इशारा देण्यात आला आहे. मदत देण्यास उशीर झाल्यास पिक विमाच्या अधिकाऱ्यांन वर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
पालकमंत्र्यांनी सांगितले की, पावसाची कमतरता असल्यामुळे अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आठ दिवसाच्या आता शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात होईल.
नाशिक जिल्ह्यात पावसाची कमतरता असल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी, कपाशी, मूग, भुईमूग, तूर व भाताचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी सरकारने ओरिएन्टल पीकविमा कंपनीला १०५ कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. यापैकी केवळ ५७ कोटी ४६ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे.
यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयात ओरिएन्टल पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पालकमंत्र्यांनी पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर आपला तीव्र संताप व्यक्त केला.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.