Crop Insurance : दरवर्षी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. वातावरणात बदल झाला तर पिकांन वरती रोगांचा प्रादभार्व सुध्दा वाढतो त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन सुध्दा कमी होत असते. हि बाब लक्षात घेत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आधार म्हणून पंतप्रधान पिक विमा योजना हि योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळते.
Crop Insurance In Maharashtra |
या योजने मध्ये शेतकऱ्यांना विमा भरण्याची वेळी प्रीमियम भरावी लागते तसेच उर्वरित रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरते. कृषिमंत्र्यांनी खरीप हंगामातील पिक विमा विषयी काही माहिती सार्वजनिक केली आहे.
खरीप हंगामात महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तसेच पिक विमा कंपन्यानी आतापर्यंत १ हजार ९६६ कोटी ६३ लाख रुपये दिले होते.
उर्वरित रक्कम ४४७ कोटीची नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर टाकण्यात येणार आहे. कृषीमंत्र्यानी गुरुवारी बैठक घेतली, त्यावेळेस पिक विमा बाबत हि माहिती सर्वाजनिक केली आहे.
आतापर्यंत ४३ लाख ८६ हजार ७६३ शेतकऱ्यांना १९६६ कोटी ६३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आले आहे. ५७ लाखा पेक्षा जास्त शेतकरी पिक विमा खरीपाचे लाभार्थी असून यांना जवळपास २४१३ कोटी ६९ कोटीची नुकसान भरपाई ठरवण्यात आली आहे.
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना उर्वरित पिक विमाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर पाठवण्यात यावे असे आदेश कृषिमंत्री सत्तार यांनी कंपन्यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच नुकसान भरपाई यईल.