Crop loan : भारतातील शेतकरी हा शेतीवरच अवलंबून आहे. भारताला कृषी प्रधान देश म्हणून सुध्दा ओळखल जात आहे. जागतिक पातळीवर भारताचा सर्वात मोठा आहे. पण भारतातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे दरवर्षी नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांनवर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. यामुळे शेतकरी आपली प्रगती करु शकत नाही.
Crop loan |
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या माहिती नुसार, राजस्थान मध्ये ३.७१ लाख शेतकऱ्यांना बिन व्याज कर्ज देण्याचे लक्ष ठरवले आहे. १२ कोटी रुपये शेतकऱ्यांना देऊन २६.९२ लाख शेतकरी कर्ज मुक्त झाले अशी माहिती मुख्यमंत्री अशाके गेहलोत यांनी ट्विट वरुन दिली आहे. तसेच ११ वर्षा पर्यंत ३.१७ लाख नवीन शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सुविधा दिल्या जाणार असल्याच सांगितल आहे.
राजस्थान मध्ये यावर्षी नवीन शेतकऱ्यांना जवळपास २३३ कोटीचे कर्ज देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी किंवा कर्ज मिळवण्यासाठी कोणताही त्रास शेतकऱ्यांना होऊ नये यासाठी राज्य सरकार कार्यक्रमही राबवणार आहे. राज्य सरकारने यावर्षी आतापर्यंत नवीन शेतकऱ्यांना १.२९ लाख शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. तसेच शेती करण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशाके गेहलोत शेतकऱ्यांना कमी व्याजदर, सबसिडी, कृषी कर्ज अशा प्रकारे पुरवठा केला जाणार आहे.