Current Price Today : या आठवड्यात कापूस आणि सोयाबीनचे भाव वाढणार
current price today |
सोयाबीनचे भाव वाढणार का २०२२-२३ ?
मागील दिवसात महाराष्ट्रासह इतर राज्यात सोयाबीनचे भाव घसरत आहे. तसेच राज्यात सरासरी सोयाबीनला भाव ५ हजार पासून ते ५५०० पर्यंत मिळत आहे. काही जाणंकरांच्या मते या आठवड्यात १०० रुपयांनी सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण, सध्या बाजार समिती मध्ये आवक कमी येत असल्यामुळे सोयाबीनच्या भावात सुधारणा पाहयला मिळणार आहे. सोयाबीनचे भाव वाढतील या आशाने शेतकऱ्यांनी सोयाबीन रोखून ठेवला आहे. तसेच काही शेतकरी टप्याटप्याने सोयबीन बाजार समिती मध्ये आणत आहे. या आठवड्यात सोयानबीन भावात स्थिरता पाहयला मिळणार आहे. ३ टक्कांनी पामतेलाची वाढ मलेशियात पाहयला मिळाली, तसेच कच्चा तेलाच्या किंमतीत सुध्दा स्थिरता पाहयला मिळाली त्यामुळे सोयबीन भावात सुधारणा होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
कापसाच्या भावात सुधारणा 2022-23 ?
मागील आठवड्यात कापसाच्या भावात ५०० ते ६०० रुपयांनी घसरण पाहयला मिळाली आहे. तसेच या आठवड्यात कापसाच्या भावात सुधारणा झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात ३०० ते ७०० रुपयांनी कापसाच्या भावात सुधारणा झाली आहे. मागील आठवड्यात सरासरी कापसाला भाव ८१०० ते ८५०० पर्यंत मिळाला आहे. तसेच या आठवड्यात ९००० ते ९२०० हजार पेक्षा जास्त भाव मिळाला आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी जास्त भाव कापसाला मिळेल या आशाने शेतकरी कापूस रोखून ठेवला आहे. काही जाणंकारांच्या मते शेतकरी आता टप्याटप्याने कपूस विक्री करत आहे. तसेच कापसाची आवक बाजार समिती मध्ये कमी येत असल्यामुळे कापसाच्या भावात आणखीन सुधारणा सुध्दा पाहयला मिळू शकते.