
Cyclone : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मान्सूनची बऱ्याच दिवस वाट पाहवी लागणार आहे. याचे मुख्य कारण, खोल अरबी समुद्रात एक नवीन चक्रीवादळ तयार होत असल्यामुळे याचा परिणाम मान्सून वर झालेला पाहयला मिळत आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार मान्सून आता कोकण भागाकडे सरकत आहे.
Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळ
अरबी समुद्रात बिपरजॉय नावाने एक चक्रीवादळ तयार झाले आहे. तर कोकण भागातील मच्छिमारा लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कारण पाऊस येणार नाही पण वादळी वाऱ्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सायंकाळ पार्यंत बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र गतीने वाटचाल कारणार आणि पाकिस्तान मध्ये जाऊन धडकणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आजचा हवामान अंदाज
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले असले तरी या पासून भारताला जास्त धोका नाही, याचा परिणाम मान्सूनवर झाल्यामुळे मान्सून लांबणीवर राहण्याची दाट शक्यता आहे.
तीन आठवड्यात तब्बल हिंद महासागरात तीन चक्रीवादळ तयार झाले होते. सध्याच्या परिस्थितीत होणाऱ्या चक्रीवादळाला बांग्लादेशाने बिपरजॉय नाव दिले आहे.
हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
