Cyclone : पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तसेच नवीन मोचा चक्रीवादळ निर्माण झाले आहे. आज सायकाळ पर्यंत बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ हे अतिशय तीव्र होणार असून महाराष्ट्रासह इतर राज्यात सुध्दा याचा परिणाम पाहयला मिळणार आहे. पुढील दोन दिवसात म्हणजे १२ मे पर्यंत ईशान्य पूर्व मध्य बंगालच्या खाडीपासून मोचा चक्रीवादळे हे म्यानमारकडे जाणार असे हवामान अंदाज मध्ये सांगण्यात आले आहे.
जागतिक हवामान संघटना ( WMO ), Cyclone
2023 मधील प्रथम हे चक्री वादळ असून यास जागतिक हवामान संघटनेने सायक्लोन मोचा असे म्हटले आहे. सायक्लोन मोचाला मराठीतून आपण मोचा चक्रीवादळ म्हणत आहोत. जागतिक हवामान संघटनाच्या मते, आज महाराष्ट्रसह जोरदार वारे तसेच अनेक राज्यात वादळी पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोचा चक्रवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर १२ मे पर्यंत राहणार असे मत जागतिक हवामान संघटनाचे आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा निर्माण झाल्यामुळे, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा या पाच राज्यात मोचा चक्रवादळाचा परिणाम पाहयला मिळणार आहे.
हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील व्हा