Cyclone : बंगालच्या सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी मोचा चक्रवादळ तयार झाले आहे. गेल्या दिवसापासून राज्यात नव्हे संपूर्ण भारतात मोचा चक्रवादळा विषयी चर्चा सुरु आहे. चक्रवादळ तीव्र रुप धारण केल्यामुळे अनेक राज्यात वादळी वारे, मुसळधार पाऊस तसेच गारपीट सुध्दा होण्याची शक्यता हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे.
Cyclone , मोचा चक्रवादळ
मोचा चक्रवादळामुळे रौद्र रुप धारण केल्यामुळे मणिमूर, नागालँड आणि त्रिपूरा भागात जोरदार वारे तसेच वीजासह जोरदार पाऊस होणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, आसाम या भागात पुढील ३ तीन दिवस चक्रवादळाचा धोका असणार आहे. केरळ, कर्नाटक, अरुणाचल, मेघालय, या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार असणार तर अनेक ठिकाणी उष्णतेचे प्रमाण वाढणार आहे. दिल्ली, गुजरात, गोवा, ओडिशा या राज्यात उष्णतेचे प्रमाण वाढणार आहे.
हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.