Cyclone Mondous : काही तासात महाराष्ट्रावर सुध्दा मंदौस चक्रवादळाचा परिणाम होण्यास सुरुवात होईल. शेतकरी मित्रांनो, पुढील २४ तासात मंदौस चक्रवादळ ( Cyclone Mondous ) हे तामिळनाडूच्या किन्नारपट्टीवर धकडकण्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे.
Cyclone Mondous |
मंदौस चक्रवादळ ( Cyclone Mondous ) उग्र होत असल्यामुळे तामिळनाडू मध्ये किन्नारपट्टीवर जोरदार पाऊस झाला आहे. रात्रीपासून किन्नारपट्टीवर वाऱ्याचा वेग सुध्दा वाढला आहे. त्यामुळे तेथील राज्य सरकारने नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना सुध्दा दिल्या आहेत. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश मध्ये मंदौस चक्रवादळाचा ( Cyclone Mondous ) परिणाम सर्वात जास्त दिसून येणार असल्यामुळे तेथील राज्य सरकार सतर्क झाले आहे.
मंदौस चक्रवाळाचे ( Cyclone Mondous ) उग्र स्वरुप पाहता, तामिळनाडूतील राज्य सरकारने आंतराष्ट्रीय विमाने तसेच १६ उड्डाणे हे रद्द केली आहे. हवामान विभागने १३ जिल्ह्यात रेड अलर्ट आणि राज्य सरकारने महाविद्यालयात सुट्टी दिली आहे.
महाराष्ट्रात आणखीन थंडी वाढणार आहे. तसेच चक्रवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडणार आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह, युपी, मध्यप्रदेश, तामिळनाडू आंध्र प्रदेश अशा इतर राज्यात अवकाळी पाऊस होणार आहे. महाराष्ट्रात मराठवाडा, कोकण, विदर्भात अवकाळी पाऊस भाग बदलत पडणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची तसेच कुटूंबाची काळजी घ्यावी. ११ डिंसेबर ते १५ डिंसेबर पर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज सांगितला आहे.