
Drought 2023 : नांदेड आणि हिंगोली हे दोन जिल्हे वगळता संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा मोठा खंड पडला आहे. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांनी माना खाली टाकल्या आहेत. मराठवाड्यातील बहूतांश भागात दुष्काळाची सारखी परिस्थितीत निर्माण झाली आहे.
कृषी मंत्री धनंजय मुंडे, यांनी मराठवाड्यातील आठ जिल्हयातील संदर्भात आज बैठक घेतली आहे. या आठ जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड असल्यामुळे शेतकऱ्यांन समोर मोठे संकट उभे राहिले आहे. या दुष्काळ सारख्या परिस्थितीत वर कशी मात करता येईल या बैठकीत चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी राज्य सरकार जनावरांच्या चारांची सोय तसेच पाण्याची पिण्याची नियोजन विभागीय आयुक्त कार्यालय मध्ये चर्चा झाली आहे.
कृषी विभाग, महसूल आणि पिक विमा कंपन्याना सोबत घेऊन मराठवाड्यात तात्काळ पंचनामे सुरु करावे असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. हे पंचनाम पूर्ण करुन सात दिवसाच्या आत आहवल सादर करावा असे आदेश सुध्दा देण्यात आले आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे दुष्काळ अजून घोषित करता येणार नाही. भारतीय हवामान विभागाने ( India Meteorological Department ) दिलेल्या अंदाजनुसार मराठवाड्यात ८ सप्टेंबर पासून ते २१ सप्टेंबर पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
