Earn Money From Farming : शेतकऱ्यांनसाठी आनंदाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट राज्य सरकारकडून मिळाली आहे. शेतकरी मित्रानो तुमच्याकडे पडीक जमीन असली तरीहि त्यापासून चांगल्या उत्पादन कमवू शकतात. राज्य सरकारने नवीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या जमीनी भांड्याने घेऊन त्यावरती सोलर पॅनल लावणार आहे. शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत न व्हावा यासाठी सौर कृषी वाहिनी 2.० योजना राबवण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रथम वर्षाकाठी ७५ हजार रुपये देण्याचे निर्णय ठरला होता. परंतू राज्य सरकारने विचार करत १ लाख २५ हजार रुपये सौर कृषी योजनेअंतर्गत वर्षाकाठी देण्यात येणार आहे.
सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत अटी
शेतकरी आता ५ किलो मीटर अंतरावरील शेत जमीन किंवा पडीक जमीन भाड्याने देऊ शकणार आहे.
सर्वात महत्वाची अट म्हणजे शेतकरी 3 हेक्टर पासून ५० हेक्टर पर्यंत शेत जमीन सरकारला भाड्याने देऊ शकणार आहे.
तसेच दरवर्षी शेतकऱ्यांची निधीत 3 टक्के पर्यंत वाढ होऊ शकणार आहे.