महाराष्ट्र सरकारने अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन निर्णय काढून त्यात १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपायांची निधी मंजूर केला आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी २० कोटी ४२ लाख ६१ हजार रुपायांची नुकसान भरपाई १८ हजार ३६४ शेतकऱ्यांन मध्ये तातडीने वाटण्यास मंजूरी दिली आहे. ४ ते ८ मार्च आणि १६ ते १९ मार्च दरम्या जळगाव जिल्ह्यात अवेळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
३३ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्राचे पिकांची नासाडी झाल्यास अशा क्षेत्राला नुकसान झाले असे गृह धरले जाते. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सर्व विभागीय आयुक्ताकडून निधीची मागणी करण्यात आली होती. राज्य शासनाने तातडीने निर्णय घेत शासन निर्णय काढून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार कोटीची मदत जाहिर केली. लवकरात लवकर नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात यावी यासाठी प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत.
विभागानुसार नुकसान भरपाई
अमरावती = २४ कोटी ५७ लाख ९५ हजार
नाशिक = ६३ कोटी ९ लाख ७७ हजार
पुणे = ५ कोटी ३७ लाख ७० हजार
छत्रपती संभाजीनगर = ८४ कोटी ७५ लाख १९ हजार
संपूर्ण रक्कम = १७७ कोटी ८० लाख ६१ हजार