शेतकऱ्यांना कर्ज माफी आता मिळणार | छत्रपती शिवाजी महाराज योजनेतंर्गत | Farming Insurance

Farming Insurance : शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार आता नवनवीन योजना राबवत असतात. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा माफी मिळणार याबाबत आपण सविस्तर पाहणार आहोत. त्याआगोदर आपण आपला बळीराजा वेबसाइटवर नवीन असाल तर आताच आमच्या WhatsApp ग्रुपवर जॉईन व्हा.

Farming Insurance

शेतकऱ्यांना कर्ज माफी कधी मिळणार ? | Farming Insurance

विधारनसभेत सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या माहिती नुसार, छत्रपती शिवाजी महाराज योजनेंतर्गत पोर्टल सुरु करुन जे शेतकरी पात्र असतील अशा शेतकऱ्यांची यादी तयार केली जाणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी अनेक संघटना तसेच शेतकऱ्यांनी मागणी केली होती.

अंबादास दानवे यांनी विधानसभेत यवतमाळ मध्ये छत्रपती‍ शिवाजी महाराज योजनेंतर्गत २८ हजार ४६४ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. ३८९ कोटी ६५ इतका निधी मंजूर झालेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप कर्जमाफीची रक्कम आलेली नाही असा थेट प्रश्न उपस्थिती केला गेला आहे.

यास उत्तर म्हणून सावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ मधील ३४ हजार ११८ शेतकऱ्यांना आतापर्यंत ६५ कोटी ३४ लाखाची कर्जमाफी देण्यात आली आहे.

मागील दोन वर्ष छत्रपती शिवाजी महाराज योजनचे पोर्टल बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळाला नाही. या योजनेअंतर्गत तीन विभाग करण्यात आले आहे. दीड लाखांची कर्जमाफी, वन टाईम सेटलमेंट, नियमित कर्जफेड असे तीन विभाग करण्यात आले आहे. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांना २५ हजार रुपायाचे अनुदान देणार होते.

नियमित कर्जफेड म्हणजेच प्रोत्साहान अनुदान ६५ कोटी रुपये आतापर्यंत योजनेतंर्गत दिले आहेत. १ लाख ७८१ शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अनुदान जवळपास १ कोटी ०३८ लाख रुपये देण्यात आले आहेत. वन टाईम सेटीमेंट मध्ये ९ हजार ९३५ शेतकऱ्यांना योजनेतंर्गत १०७ कोटी रुपये दिले आहेत. पण पोर्टल बंद असल्यामुळे निधी उपलब्ध होऊ शकला नाही.

एप्रिल मध्ये पोर्टल सुरु होणार असून, ५५ कोटी निधी आधीच देण्यात आला आहे. अर्थसंकल्पात ८०० कोटीची निधीची तरदूत करण्यात आली आहे. प्रोत्साहान अनुदानसाठी योजनेतंर्गत १ हजार कोटी आता देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे ९८ टक्के शेतकऱ्यांना ३१ मार्च पूर्वीच अनुदान देण्यात येणार आहे.

सावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात लवकरच पोर्टल सुरु करुन, पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. अशी सावे यांनी मोठी घोषणा केली आहे.

Weather Update : आज रात्री या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता !

Onions : कांदा उत्पादकांना खुशखबर | अनुदानात केली मोठी वाढ

शेतकऱ्यांचे राशन बंद | शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार अनुदान | Ration Card

Leave a Comment