Farming Insurance : महाराष्ट्रात दर वर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच शेतकऱ्यांच्या जिवाला सुध्दा धोका निर्माण होत असतो तर अनेकदा वादळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचा जिव सुध्दा गेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचते,पीक वाहून जाते, किंवा शेतात गाळ सुध्दा निर्माण होतो, शेतातील माती सुध्दा वाहून जाते असते. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक विमाकंपनीकडे अर्ज केला जातो.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळणार याबाबत नवीन दर राज्य सरकारने शासन निर्णय द्वारे जारी केले आहे. महाराष्ट्र सरकारने सोमवारी शासन निर्णय द्वारे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान भरपाई किती देणार याबाबत नवीन दर जारी केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे १ लाख ३९ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असते.
२०१५ ते २०२० एसडीआरएफचे जुने दर
जिराईत पिकांना प्रति हेक्टर = ६ हजार ८००
बागायती पिकांना प्रति हेक्टर = १३ हजार ५००
बहुवार्षिक पिकांन प्रति हेक्टर = १८ हजार
एसडीआरएफचे नवीन दर 2023
जिराईत पिकांना प्रति हेक्टर = ८ हजार ५००
बागायती पिकांना प्रति हेक्टर = १७ हजार
बहुवार्षिक पिकांन प्रति हेक्टर = २२ हजार ५००
जिवाची हाणी झाल्यास ४ लाख पर्यंत मदत मिळणार, अवयव नाही राहिल्यास ७४ हजार पासून तर २ लाख ५० हजार पर्यंत दर आर्थिक मदत मिळणार.
एकद्या व्यक्तीला जखम झाल्यास १६ हजार रुपये, पाण्यात घर गेल्यास २ हजार ५००, शेतात गाळ झाल्यास १८ हजार तर जमीन खरल्यास किंवा माती वाहून गेल्यास ४७ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.
पक्क घर पडल्यास १ लाख २० हजार प्रत्येकी कुटूंबाना मिळणार, झोपडी असेल तर ८ हजार आणि घरांची पडझड झाल्यास ६ हजार ५०० आणि कच्च घर पडल्यास १ लाख तीस हजार पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
राज्य सरकार शेतकऱ्यांना २000 रु. हप्ता देणार | Farming Insurance
प्रति कोंबडी १०० रुपये, प्रति मेंढी ४ हजार, प्रति म्हैस ७ हजार ५००, प्रति बैल ३२ हजार, प्रति वासरु २० हजार पर्यंत आर्थिक मदत शेतकऱ्यांना अशा प्रकारे देण्यात येणार आहे.
Farming Insurance : ७९ लाख शेतकऱ्यांना १६ कोटीचा निधी मिळणार | पहिला हप्ता