Farming Insurance : फळ पिक विमा योजना अंतर्गत बोगस अर्जांवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. कृषी विभागाने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर यामध्ये साडे चौदा हजार पेक्षा अधिक बोगस कागदपत्रे आढळली होती. तसेच आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत आठ कोटी विमा हप्ता जप्त करण्यात आलेला आहे.
फळ पिक विमा योजनेअंतर्गत कारवाई | Farming Insurance
फळ पिक विमा योजने अंतर्गत अर्जांची संख्या वाढल्यानंतर कृषी विभागाला यावरती संशय आला होता. यामुळे कृषी विभाग प्रत्यक्ष पाहणी करण्यास उतरले. यामध्ये साडे चौदा हजार इतक्या अर्जाचा बोगस कारभार सुरु होता. या अगोदरही साडेसात हजार प्रत्यक्ष हे बोगस अर्ज होते.
बनावट कागदपत्राच्या आधारे काही लोक फळ पिक विमा योजनेअंतर्गत लाभ घेतात. परंतू यांच्यावर कारवाई केल्यानंतर यामध्ये अर्जांची घट पाहायला मिळाली आहे. फळ पिक विमा योजनेअंतर्गत चाळीस हजार 140 इतके अर्ज योजनेअंतर्गत कमी झाले आहे.
NAMO Shetkari Yojana : 2 हजार रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
मोसंबी, चिक, पेरू सीताफळ, द्राक्ष, आंबा, काजू, स्टोबेरी, डाळिंब, केळी या योजनेअंतर्गत पिकांना संरक्षण मिळते, फळ पिक विमा योजना अंतर्गत 65 कोटी इतका निधी मंजूर झालेला होता. यामध्ये साडे चौदा हजार अर्जांन साठी 13.39 कोटी राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात येणार होते. २०२२ ते 2023 यावर्षी एक हेक्टर प्रमाणे 28 हजार रुपये अनुदान देण्यात येणार होते. परंतु प्रत्यक्ष कारवाई केल्यानंतर 40 हजार अर्जांची संख्या कमी झाल्यामुळे 13 कोटीचा निधी हा बचावला गेलेला आहे.