Farming Insurance : नमस्कार शेतकरी मित्रांनो जून आणि जुलै महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. अमरावती जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना 204 कोटी 87 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही दिलासादायक मोठी अपडेट आहे. आपण याबाबत सविस्तर बातमी पाहणार आहोत नवीन असाल तर आमच्या आपला बळीराजा व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
अडीच लाख शेतकऱ्यांनसाठी नुकसान भरपाई मंजूर | Farming Insurance
राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने 1071 कोटी 77 लाख रुपयाचा नीधी मंजूर केलेला आहे. याबाबत महसूल विभागाने चार ऑक्टोंबर रोजी जीआर काढला होता. राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. पुढील हंगामात शेतकऱ्यांना हा निधी उपयोगी पडावा म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केले, त्याच प्रकारे विहित दराने ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवली जाणार आहे.
IMD : महाराष्ट्रात हवामान कोरडे होणार
जून आणि जुलै महिन्यात दोन लाख 17 हजार 241.57 हेक्टर वर शेती पिकांचे नुकसान झाले होते. अडीच लाख शेतकऱ्यांनसाठी राज्य सरकारने 185 कोटी दहा लाखापर्यंत निधी मंजूर केलेला आहे. 10 हजार 757 हेक्टर ७३ आर पॉइंट क्षेत्रासाठी 19 कोटी 76 लाख 63 हजार रुपये इतका निधी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.