Farming Insurance : दर वर्षी प्रमाणे याही वर्षी सतत पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असल्यामुळे राज्य सरकारने ५ एप्रिल रोजी ३४ लाख शेतकऱ्यांना ३३०० कोटीची नुकसान भरपाई मंजूर केली होती. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये शेती पिकांचे ( Farming Insurance ) नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना नोव्हेंबर मध्ये राज्य सरकारने मदतीचे आश्वासन दिले होते.
ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना तातडीने दुप्पट नुकसान भरपाई खात्यात जमा करण्यात येईल असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. पण सत्य परिस्थिती पाहता, पंचनामे इतर कामकाजात भरपूर वेळ निघून गेली आहे. नोव्हेंबर मध्ये पहिल्यांदा आश्वासन दिले त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा ५ एप्रिल रोजी आश्वासन दिले तसेच शासन निर्णय निघून सुध्दा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.
महसूल काही अधिकाऱ्यांच्या मते, सध्या निधी वाटपाचे काम सुरु आहे. तसेच शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यासाठी किमान दोन महिने लागतील आणि शासन निर्णय निघाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई हि वितरीत करण्यात येणार आहे. नुकसान भरपाई उशीरा मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मध्ये नाराजी पाहयला मिळत आहे.
एनडीआरएफच्या तर्फे राज्यात शेतकऱ्यांना जिरायती शेतीसाठी १३ हजार ६०० तर बागायतीसाठी २७ हजार पर्यंत नुकसान भरपाई दुप्पट घोषित केली होती. तसेच 3 हेक्टर पर्यंत मर्यादा ठेवण्यात आली होती. पण आता एनडीआरएफच्या नव्या निकष्यानुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर नुसार आधी ६ हजार ८०० वरुन ८ हजार ५०० पर्यंत नुकसान भरपाई ठरवली आहे. अशा निर्णयामुळे अधिकाऱ्यांन मध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
अशा प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group सामील व्हा.