बीड जिल्ह्यातील या तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार ? | beed nuksan bharpai 2023 | Farming Insurance
Farming Insurance : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यानंतर अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाने तातडीने पंचनामे करत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनाने राज्य सरकारकडे ४०० कोटी पर्यंत अनुदानाची मागणी केली होती.
राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवल्या नंतर राज्य सरकारने जीआर काढत ४१० कोटी पर्यंत अनुदान मंजूर केले आहे. जीआर काढल्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नव्हती पण तब्बल तीन महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
परळी, आष्टी, गेवराई, धारुर, केज, माजलगाव, बीड, अंबाजोगाई या तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आले आहे. तसेच लवकरात लवकर बाकी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येईल असे आश्वासन मिळत आहे.
शेती विषयी माहिती पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.