Farming Update : हिवाळ्यात या भाज्याचे पिक घेऊन भरघोस उत्पादन मिळते

Farming Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेतले जातात. भारत देश हा गेल्या काही वर्षापासून वेगवगळ्या प्रकारचे भाजीपाल्याचे पीक घेऊन दुसऱ्या देशात भाज्यापालाची निर्यात करत असल्यामुळे भारताला आता भाजीपाला उत्पादक देश म्हणून ओळखले जात आहे. 

Farming Update


भारतातील शेतकरी भाजीपाल्यावर वेगवगळे प्रयोग करुन, त्यापासून दुप्पट उत्पादन मिळवत आहे. खास करुन भारतातील शेतकरी खरीप हंगामात भाजीपाल्यांची शेती करतात. विशेष म्हणजे खरीप हंगामापेक्षा जास्त हिवाळ्यात भाजीपालेचे पीक चांगलेच येते. कारण कमी कालवधीत भाजीपाल्यापासून उत्पादन जास्त मिळते.

हिवाळ्यात या भाज्याचा मोठा समावेश 

मटार : ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान मटार पेरणी करण्यात येते. हिवाळ्यात कमी कालावधीत भरपूर उत्पादन मिळते.

बटाटा : हिवाळ्यात जमिनीची चांगली मसागत करुनच बटाट्याची लागवड करावी, तसेच योग्य वेळी चांगल्याप्रकारे खत घालावे. बटाटापासून चांगलेच उत्पादन होईल.

लसूण : आपल्या रोजच्या आहारात लसणाचा उपयोग करत असतो. लसणा पासून अनेक फायदे आहेत. शेतकरी मित्रांनो प्रति हेक्टर ६०० ते ७०० किलो लसून पेरण्यासाठी पुरेसा आहे. लसणाची पेरणी करण्याअगोदर त्याचे नियोजन करुनच लसणाची पेरणी करावी जेणेकरुन तुम्हाला चांगले उत्पादन मिळेल.

कोबी : हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात डोंगरीभागात कोबीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. कोबीचे उत्पादन चांगले मिळावे म्हणून काही शेतकरी कंपोस्ट खताचा किंवा सेंद्रिय खताचा सुध्दा वापर करतात.

शिमल मीरची : भारतात मोठ्या प्रमाणात शेतकरी शिमला मिरचीची शेती करतात. आणि त्यापसून भरघोस उत्पादन मिळते. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात अनेक राज्यात शिमला मिरचीची मागणी वाढते त्यामुळे शेतकऱ्यांनी हिवाळ्यात शिमला मीरचीची शेती केली तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळू शकतो.

Leave a Comment