Harbhara Rate : या वर्षी केंद्र सरकारने देशात 131 लाख टन हरभराचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र देशामध्ये अतिवृष्टी, गारपीट तसेच उष्णतेच्या लाटांमुळे उत्पादनात घट झालेली पाहायला मिळत आहे. यामुळे भारतात हरभराचे उत्पादन 85 ते 90 लाख टन होणार असे जाणकार सांगतात. तसेच नाफेड आणि उद्योगाकडील साठवण जवळपास 20 लाख टन पर्यंत असू शकते. त्यातच बफर स्टाॅक कमी झाल्याने नाफेडची खरेदी जोरदार चालू आहे. देशातील मागणी आणि पुरवठा पाहता हरभराचे दर पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे असे जाणकारांच मत आहे.
Harbhara Rate |
जगामध्ये हरभराचे उत्पादन वाढतय
देशात हरभराचे उत्पादन वाढत आहे. कडधान्य मध्ये हरभराचा क्रमांक तिसरा लागत आहे. तसेच जगामध्ये सर्वाधिक हरभराचे उत्पादन घेणारा भारत देश आहे.
जगात हरभराचे उत्पादन
2016 = 116.2 लाख टन
2018 = 169 लाख टन
2020 = 150 लाख टन
2021 = 170 लाख टन
असा जाणकारांनी सांगितला आहे.
भारतात हरभराचे दोन प्रकार
1) देशी हरभरा : देशी हरभराचे उत्पादन भारतात आणि शेजारच्या देशामध्ये घेतले जाते.
2) काबुल हरभरा : काबुल हरभराचे उत्पादन भारत, पश्चिम आशिया आणि इतर देशांत घेतले जाते.
जगामध्ये 60 ते 65 देशात हरभराचे उत्पादन घेतले जाते तसेच या देशामध्ये हरभराचे उत्पादन वाढत आहे. एकट्या भारत देशात हरभराचे उत्पादन 69℅ टक्के आहे.
भारतात हरभराचे उत्पादन
2016 – 17 = जवळपास 94 लाख टन
2017 – 18 = 113.8 लाख टन
2020 – 21 = 119 लाख टन
असा अंदाज जाणकारांनी सांगितला आहे.