IMD : महाराष्ट्रातील बहूतांश भागात गेल्या काही दिवसापासून पावसाने उघडीप घेतली आहे. हवामान खात्यानुसार अनेक काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे. परंतू राज्यात तूरळक ठिकाणी १५ मिनिटाचा किंवा २० मिनिटाचा साधरण पाऊस होत राहिल. राज्यातील बहूतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. बहूतांश गावात अजूनहि चांगल्याप्रकारे पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांनवर मोठे संकट ओढावले आहे.
उद्याचे हवामान अंदाज | IMD
मागील दिलेल्या अंदाजनुसार महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यातील सुरुवातीच्या दोन आठवड्यात पावसाने उघडीप घेतली आहे. परंतू हवामान खात्यानुसार पुढील चार ते पाच दिवसानंतर राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. उद्या कोकण भागात आणि विदर्भात तूरळक ठिकाणी साधरण पाऊस होणार आहे. परंतू उर्वरित भागात मागील काही दिवसापासून तसेच पुढील काही दिवस पावसाची उघडीप असणार आहे.
राज्यातील पुणेसह मुंबई मध्ये सुध्दा पावसाने दडी मारली आहे. हवामान खात्यानुसार उद्या, पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहयला मिळणार आहे. तसेच आज पालघर आणि ठाणे मध्ये पाऊस पडू शकतो. तसेच कोकण भागात १० ऑगस्ट पर्यंत पावसाचा इशारा दिला आहे. IMD ने दिलेल्या अंदाजनुसार महाराष्ट्रात उर्वरित भागात पावसाचा जोर कमी असणार आहे.