IMD : १७ जुलै रोजी भारतीय हवामान विभागाने पुढील ५ दिवसाचा हवामान अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, आज राज्यात बहूतांश भागात वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पाऊस पडू शकतो. मुंबई ठाणे भागात पुढील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुणे भागाला आज भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अर्लट जारी केला आहे.
IMD | India Meteorological Department
कोकण ( ऑरेंज अर्लट ) = रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात भाग बदलत तूफान पडणार तसेच उर्वरित भागात मध्यम प्रकारचा पाऊस पडेल.
विदर्भात ( येल अर्लट ) = गोंदिया, भंडारा, वाशीम, गडचिरोली, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात बहूतांश भागात आज रात्री जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
आज 18 जुलै रोजी राज्यात विविध ठिकाणी हलका पाऊस तसेच मध्यम स्वरुपाच आणि जोरदार वाऱ्यासह तूफान पाऊस होऊ शकतो.