
IMD : महाराष्ट्रात मान्सून केव्हा दाखल होईल या बाबत शेतकऱ्यांन मध्ये चर्चा सुरु झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी १० ते १५ दिवसांनी मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सूनचे आगमन कधी होणार ? | IMD
महाराष्ट्रातील शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे. पंरतू आता मान्सूनचे आगमन केरळ मध्ये झाले असून लवकरच मान्सून महाराष्ट्रात आगमन होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील काही भागात पुढील काही दिवस उन्हाचा फटका बसणार आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात पुढील २४ तासात मान्सून आगमन होईल. तसेच मुंबई मध्ये पुढील दोन दिवसात मान्सूनच्या पावसाची सुरुवात शक्यता आहे पण हि सामन्य तारीख आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. परंतू भारतीय हवामान विभागाच्या मते, संपूर्ण राज्यात १६ जून ते १८ जून पर्यंत मान्सूनचे आगमन होईल असे सांगण्यात आले आहे.
हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात