IMD : आज रात्री 17 जिल्ह्यांत अति मुसळधार पाऊस पडणार

IMD : आज रात्री 17 जिल्ह्यांत अति मुसळधार पाऊस पडणार
IMD : आज रात्री 17 जिल्ह्यांत अति मुसळधार पाऊस पडणार

 

IMD Weather : आज रात्री मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात ठिक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. विदर्भातील पूर्व भागात आणि कोकण भागात तसेच मध्य महाराष्ट्रात काही भागात आज रात्री अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Panjab Dakh : 1 ऑगस्ट पर्यंत हवामान अंदाज जारी

आजचा हवामान अंदाज | India Meteorological Department

गेल्या दीड महिन्यापासून राज्यात पावसाने उघडीप घेतली होती. परंतू राज्यात आता पावसासाठी अनूकुल वातावरण असल्यामुळे पुढील सलग पाच दिवस अनेक जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस होत राहणार आहे. भारतीय हवामान विभ‍ागाने राज्यात आज चंद्रपूर, बुलढाणा, सातारा, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, चंद्रपूर तसेच बुलढाणा या जिल्ह्यांत दिवस भरात अति मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आज रात्री पाऊस पडणार | IMD

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अदांजनुसार, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक पाहयला मिळणार आहे. पुढील तीन ते चार तासात पुन्हा एकदा रायगड, आणि पालघर परिसरात‍ आज रात्री अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार आहे.

सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यात आज रात्री अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम या जिल्ह्यात भागात बदलत बहूतांश भागात आज मुसळधार पाऊस पडणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर आताच सामील होऊ शकतात.

IMD : 24 तासात 13 जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार
IMD : 24 तासात 13 जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार

Leave a Comment