IMD : पुढील 24 तासात 31 जिल्ह्यात मुसळधार पाऊस

IMD : पुढील 24 तासात 31 जिल्ह्यात मुसळधार पाऊस
IMD : पुढील 24 तासात 31 जिल्ह्यात मुसळधार पाऊस

 

IMD : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मध्ये अतिवृष्टीचा पाऊस झाला आहे. तसेच पुढील काही दिवस याच भागात पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, पालघर आणि पुणे आज मुसळधार पाऊस पडणार आहे.

आजचा हवामान अंदाज | IMD 

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजनुसार आज मुंबई, सातारा, पुणे, कोल्हापूर परिसरात जोरदार पाऊस पडणार आहे. पुणे आणि पालघर मध्ये पावसाचा जोर अधिक असणार त्यामुळे हवामान खात्याने या ठिकाणी रेड अर्लट जारी केला आहे. चंद्रपूर, रत्नागिरी, मुंबई, रायगड, ठाणे, वाशिम आणि गडचिरोली मध्ये भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे. ओडिशाच्या किनारपट्टीवर आणि उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा हा कायम आहे. तसेच छत्तीसगड मध्ये दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा कायम असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असणार आहे.

२४ जुलै पासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर हा ओसणार आहे. परंतू ओडिशा या राज्यातील किनारपट्टीवर २६ जुलै रोजी बुधवारी कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो, त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पाऊस पडू शकतो.

आज पाऊस पडणार का ?

अतिवृष्टीचा इशारा ( रेड अर्लट ) : पुणे, पालघर

मुसळधार पाऊस ( ऑरेंज अर्लट ) : गडचिरोली, ठाणे, मुंबई, चंद्रपूर, वाशिम, रायगड, रत्नागिरी

मुसळधार पाऊस ( येलो अर्लट ) : बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव, नगर, जालना, परभणी, बीड, अकोला, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, भंडारा, अमरावती, गोंदिया, हिंगोल, नांदेड, लातूर,

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात

PM Kisan : 27 जुलै शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार
PM Kisan : 27 जुलै शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार

Leave a Comment