
IMD : मागील चार ते पाच विविध भागात पाऊस पडत होता. परंतू राज्यात मंगळवार पासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. येत्या पुढील २४ तासात अनेक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडणार आहे.
महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे भागात पुन्हा एकादा मुसळधार पाऊस होणार आहे. आयएमडीने ( IMD ) दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक ठिकाणी आज मान्सून चांगल्या प्रकारे सक्रीय होणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात आज अनेक महत्वाच्या ठिकाणी अति मुसळधार पाऊस होईल तसेच उर्वरित भागात रिमझिम पाऊस पडणार आहे.
कोकणच्या उत्तर दिशेत कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असल्यामुळे राज्याच्या पश्चिम किनारपट्टी आज अति मुसळधार पाऊस होईल तसेच मध्य महाराष्ट्रात आज पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले, म्हणून 6 जुलै रोजी मुसळधार पाऊस पडणार आहे.
हवामान अंदाज : WhatsApp Group वर तातडीने माहिती मिळणार
