IMD : भारतात मान्सूनचे आगमन केव्हा होणार, याबाबत अनेक जांणकरांनी अंदाज व्यक्त केला होता. पंरतू जवळपास ९० टक्के अंदाज चुकले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या मते, देशात ३० जून पासून ते ४ जून पर्यंत देशात मान्सून आगमन होईल परंतू असे झाले नाही. तसेच यावर्षी मान्सूनचे आगमन ७ जून ते ८ जून दरम्यान झाले पण मान्सूनची गती चक्रीवादळामुळे कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे पोहचलाच नाही.
कमी दाबाचा पट्टा अरबी समुदात झाल्यामुळे तेथे बिपरजॉय या नावाने चक्रीवादळ तयार झाले. या चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केल्यामुळे अनेक राज्यांना धोका निर्माण झाला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किन्नारपट्टीवर जाऊन धडकणार असल्यामुळे तेथे अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मान्सूनचे आगमन केव्हा होणार ? | IMD
भारतीय हवामान विभागाच्या मते, भारतात अनेक ठिकाणी मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे अनेक राज्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. १८ जून ते २१ जून पर्यंत मान्सून सक्रीय होईल, त्यानंतर २५ जून नंतर अनेक मान्सून तीव्र गतीने प्रवेश करेल.
हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या आपला बळीराजा WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.