
IMD : महाराष्ट्रातील शेतकरी जून महिना लागल्यापासून मान्सूनची वाट पाहत आहेत. प्रादेशिक हवामान विभागाच्या मते राज्यात ७ जून रोजीच मान्सूनचे आगमन होते परंतू बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून हा आणखीन लांबणीवर गेला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी, मध्य महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल वातावरण झाले तसेच अनेक ठिकाणी सकाळ पासून ढगाळ वातावरण पाहयला मिळत आहे.
आज रात्री पाऊस पडणार का ? IMD
उत्तर महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रात, विदर्भात आणि दक्षिण भागात आज रात्री तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे. गेल्या २४ तासात कोल्हापूर भागात तूरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर अनेक ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले आहे. पूर्व विदर्भात तूरळक ठिकाणी सकाळपासून रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यात २५ जून पासून मान्सूनची चांगल्या प्रकारे प्रगती होईल.
पुढील पाच दिवसात अनेक ठिकाणी मान्सूनची प्रगती होणार आणि संपूर्ण महाराष्ट्रात २ जुलै पर्यंत मान्सून पोहचणार अशी महिती हवामान विभागाकडून मिळत आहे. तसेच काही जांणकरांच्या मते, महाराष्ट्रात २ जुलै पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊ शकतात.
तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
